आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फ्रेम्सची विक्री, राजस्थानातील गणेशाच्या आकर्षक पेंटिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हस्तकलेच्याकलाकृतींमध्ये अनेक व्हरायटी बाजारात पाहायला मिळतात. घर सजवण्यासाठी देखील अनेक वस्तू, शोपीस यांचा वापर केला जातो. सध्या गणशोत्सवाची तयारी बाजारात सुरू आहे.
याच्याच पार्श्वभूमीवर गणपतीच्या मूर्तींप्रमाणेच राजस्थानातील जेम स्‍टोन पावडर प्रकारातील गणेशाच्या फ्रेमची नवीन श्रुंखला बाजारात पाहायला मिळत आहे. जेम स्‍टोनचा वापर केल्यानंतर त्यामधून वाया जाणाऱ्या पावडरपासून या फ्रेम, पेंटिंग बनवण्यात आल्या आहेत. फक्त गणेशाच्या नाही तर यात अनेक प्रकार आहे. घरातील शोभा वाढवण्यासाठी या कलाकृतींचा वापर केला जातो. यात राजस्थानातील परंपरेची झलकही दिसून येते. त्याचप्रमाणे खासकरून हातानेच या वस्तू बनवल्या असल्याने परदेशातही या वस्तूंची मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून येते. रंगीबेरंगी या स्‍टोनच्या पावडरने कलाकृतींमध्ये वेगळीच आकर्षकता निर्माण होते. १०० ते १००० रुपयांपर्यंत अनेक वस्तू यात पाहायला मिळत आहेत.
गणशोत्सवापार्श्वभूमीवर या फ्रेम खासकरून विक्रीस आणल्या असून यात गणेशाच्या विविध भावमुद्रेतील पेंटिंग आहेत. हे भेट स्वरुपातही देता येतात. जेम स्‍टोनच्या पावडरमधील आगळावेगळा प्रकार आहे. विनीत जोशी, जोशीबंधू ज्वेलर्स.

इतरही प्रकार
त्याचप्रमाणेयात नाइट लॅम्प, टेलीफोन डायरी, बुद्धिबळाचा पट, मोबाइल पेन स्टँड, कॉइन बॉक्स, की होल्डर यासारख्या वस्तू पाहायला मिळत आहेत. तसेच राजस्थानील पारंपरिक वेशभूषेतील महिलांचे चित्रही पाहायला मिळत आहेत.
गणेशाच्या विविध भावमुद्रा
यातअमेथिस्ट, कॅलसेडोनी, कानेलियन अगेट, गार्नेट, ग्रीन अँव्हेनट्युरीन, ब्लड स्‍टोन, रेड जॅस्पर, सोडलाइट, टरक्वाइज, यलो अगेट या स्‍टोन प्रकारांद्वारे या पेंटिंग बनवण्यात आल्या आहेत. ग्लासपेंटिंगच्या आधारे या फ्रेम असून इतर सजावटीच्या वस्तूंमध्ये लाकडाचाही उपयाेग केला आहे. यापासून गणेशाच्या अनेक भावमुद्रा यात तयार करण्यात आल्या आहेत. सिंहासनावर बसलेला, महाभारत लिहिणारा गणपती, गणेशाची साधी मूर्ती, देवीच्या रुपातील गणपतींचे पेंटिंग यात दिसून येत आहे.