आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांमुळे ‘एसटी’ला दीड हजार काेटींचा चुना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्य शासनाने २४ विविध सामाजिक घटकांना जाहीर केलेल्या प्रवासी याेजनांपाेटी एसटी महामंडळाकडून वर्षभरात ३७१५ काेटी ३९ लाख रुपयांची प्रवाशांना सवलत देण्यात अाली अाहे. यातील तब्बल १६७४ काेटी ३२ लाख रुपये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्या प्रवास सवलतीवर खर्च झाली असून यातील बहुतांश लाभार्थी बाेगस अाहेत. प्रवाशांना दिलेल्या सवलतीची रक्कम शासनाने महामंडळाकडून येणे असलेल्या १५ टक्के करातून कापून घेतली अाहे.   

शासनाच्या प्रवास सवलत याेजनेचा राज्यातील ३९ काेटी प्रवाशांनी वर्षभरात प्रवास सवलतीचा लाभ घेतला अाहे. प्रवास सवलतीमध्ये सर्वाधिक संख्या विद्यार्थ्यांची असली, तरी त्यांच्यावर हाेणारा सवलतीचा खर्च अत्यंत कमी अाहे. त्या उलट ५० टक्के भाडे सवलत असलेले ज्येष्ठ नागरिक अाणि ७५ टक्के भाडे सवलत असलेले दिव्यांगांना दिलेल्या सवलतीची रक्कम अधिक अाहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातून दिव्यांगाचे बाेगस प्रमाणपत्र मिळवून धडधाकड प्रवासी देखील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मिळालेले अाेळखपत्र अागारात सादर करून या सवलती मिळवत अाहेत. 

जळगावात ४६ काेटींची सवलत
जळगाव जिल्ह्यात वर्षभरात ज्येष्ठ नागरिकांच्या ५० टक्के भाडे सवलतीच्या याेजनेत ३७ काेटी ५५ लाख ४७ हजार ११६ रुपयांची सवलत घेतली अाहे. तर अंध, अपंगांच्या ७५ टक्के भाडे सवलतीच्या याेजनेत ८ काेटी ९५ लाख ४३ हजार ३५२ रुपयांची सवलत मिळवली अाहे. एकूण ४६ काेटी ५० लाख ९० हजार ४६८ रुपयांची सवलत दिली गेली अाहे. 
३९ काेटी सवलतदार प्रवासी      
९५ काेटी ३० लाख २३ हजार वर्षभरातील सरासरी प्रवासी लाभ     
३७१५ काेटी ३९ लाख ३३ हजार वर्षभरातील सवलत     
१६७४ काेटी ३२ लाख ज्येष्ठ, दिव्यांगांना  सवलत

महामंडळाचे अपयश 
बाेगस लाभधारकांचा शाेध घेण्याची सक्षम यंत्रणा एसटी महामंडळाकडे नाही. बसमध्ये अाढळून अालेल्या बाेगस सवलतधारकांचे अाेळखपत्र जप्त करणे, प्रवास भाडे अथवा प्रवास भाड्याच्या पटीत दंड वसूल करण्यापलीकडे  बाेगस प्रवाशांवर कारवाई हाेत नाही. अनेक वेळा प्रवाशांकडून हुज्जत घातली जात असल्याने वाहक या गाेष्टींकडे दुर्लक्ष करीत असल्याने बाेगस सवलतधारकांवर कारवाई हाेत नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय अाणि समाजकल्याण या शासकीय यंत्रणांकडून प्रमाणित करण्यात अालेली कागदपत्रे पाहून वाहक कारवाई करू शकत नसल्याचे प्रकार घडत अाहेत. ते थांबविण्यात महामंडळाला अपयश अाले अाहे.   

अाधार कार्डशी जाेडणार
एसटीच्या सवलतीच्या याेजनेस पात्र नसलेले प्रवासी देखील फायदा घेत असल्याचे लक्षात अाले अाहे. बाेगस लाभार्थ्यांना अाळा घालण्यासाठी यापुढे स्मार्ट कार्डचा उपयाेग केला जाणार अाहे. हे कार्ड लाभार्थ्यांच्या अाधार कार्डला जाेडले जाणार अाहे. त्यामुळे बाेगस लाभार्थ्यांना अाळा बसेल.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री
बातम्या आणखी आहेत...