आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपामुळे ‘एसटी’चे 4 कोटींचे नुकसान; सकाळी 6 वाजता धावली पहिली बस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एसटी कर्मचाऱ्यांनी एेन दिवाळीत संप पुकारल्यामुळे वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन चार दिवस प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. शनिवारी सकाळी ५.३० वाजता पाचव्या दिवशी संप मिटल्यामुळे सकाळी वाजता एसटी रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली.
 
भाऊबीजेमुळे दिवसभर बसस्थानक परिसरात प्रवाशांची माेठी गर्दी झाली हाेती. संपामुळे चार दिवसांत एसटी विभागाचे सुमारे 4 काेटींचे उत्पन्न बुडाले. त्यामुळे संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे चार दिवसांचे वेतन कापण्यात येईल, अशी माहिती आगार प्रशासनाने दिली.
 
दिवाळीतील चार दिवसांचा संप हा एसटी महामंडळातील ऐतिहासिक ठरला. यापूर्वी १७ १८ डिसेंबर २०१५ मध्ये कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप केला होता. त्यानंतर अाता चार दिवस संप झाला. एक, दोन दिवसात संप मिटेल, असे वाटत असताना, संप चिघळला. त्यामुळे दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले. नागरिकांनी जीव मुठीत घेऊन मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास केला. संपामुळे एसटीचे काेटींचे नुकसान झाले हे नुकसान भरून काढण्यासाठी भाऊबीजेच्या दिवशी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. दरम्यान, संप मिटल्याने भाऊबीजेला महिलांना माहेरी जाता अाल्याने त्या समाधानी दिसत हाेत्या.
 
5 हजार ६०० कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई
संपादरम्यान विभागाचे दररोज सुमारे एक कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. संपात सहभागी 5 हजार ६०० कर्मचाऱ्यांचे चार दिवसांचे वेतन कापूनही विभागाला संपामुळे सुमारे साडेतीन लाखांचा तोटा सहन करावा लागणार आहे.
 
एसटी कर्मचाऱ्यांच्या चार दिवस चाललेल्या संपादरम्यान एकता जळगाव टॅक्सी रिक्षा युनियनने ४५० वाहने उपलब्ध करून प्रवाशांची गैरसोय दूर केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान प्रवाशांना वेठीस धरता त्याच दरात सेवा देण्याचा निर्णय झाला होता. यानुसार १४ तालुक्यांमध्ये नेहमीपेक्षा जादा वाहने उपलब्ध करून देण्यात आले होते. जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रज्जाक खान यांनी दिली. या गाड्यांचे नियोजन संघटना सचिव मधुकर चौधरी, मधू कासार, छोटू पाटील, रियाज शेख यांनी केले.
 
...तर पुन्हा आम्ही संपावर जावू
चार दिवसांचा संप यशस्वी झाला आहे. शासनाने आश्वासन दिले आहे. न्यायालयावर विश्वास ठेवून संप मागे घेतला आहे. मात्र, दोन महिन्यात निर्णयानुसार मागण्या मान्य झाल्यास पुन्हा संपाचा पवित्रा घेतला जाईल.
- नरेंद्रसिंग राजपूत, विभागीय सचिव, इंटक
 
अनेक वर्षानंतर कर्मचारी दिवाळीत घरी
संपमिटल्याचे जाहीर झाल्यानंतर शनिवारी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी झाली हाेती. आगारातून एका मागून एक गाड्या बाहेर पडू लागल्या. काही वेळातच सर्व बसेस वेळापत्रकाप्रमाणे धावू लागल्याने खासगी वाहतुकीकडे गेलेल्या प्रवाशांची गर्दी बसस्थानकाकडे वळली. संपामुळे वाहक, चालकांना यंदा पहिल्यांदाच दिवाळीचा आनंद कुटुंबीयांसाेबत उपभोगता आला. संपात एसटी मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसह इंटक आदी विविध संघटना यात सहभागी होत्या.
 
वाहक, चालक तत्काळ रुजू
संप मिटताच वाहक, चालकांनी आपली जबाबदारी ओळखत कामावर येणे पसंत केले. परिणामी फेऱ्यांची संख्येत घट झाली नाही. तर दुसरीकडे संपात सहभागी नेतृत्व करीत असलेल्या कार्यालयीन लिपिक, कर्मचाऱी वर्गाने मात्र सणाचा आनंद घेणेच पसंत केले. वाहक, चालकांना मात्र भाऊबीजेच्या सणापासून दूर रहावे लागले.
 
बातम्या आणखी आहेत...