आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखली येथे प्रेमसंबंधातून विवाहित तरुण आणि तरुणीची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर - तालुक्यातील चिखली येथील विवाहित तरुण आणि तरुणीने गुरूवारी दुपारी विष प्राषण करून आत्महत्या केली. विष घेतल्याचे लक्षात येताच दोघांना दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाल्याबाबत पोलिस डायरीत नोंद आहे. 
 
चिखली येथील सुनील राजाराम खिरोळकर (वय ३१) आणि पुष्पा शिवराम तायडे (वय ३१) यांनी गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावाला लागून असलेल्या महिला शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विषारी औषध घेतले. हा प्रकार लक्षात येताच अत्यवस्थ अवस्थेतील दोघांना वेगवेगळ्या वाहनांमधून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मालवल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. यानंतर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पोलिस पाटील दिलीप सावळे यांचे फिर्यादीवरून अकस्मात मत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार माणिक निकम करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...