जळगाव- घरचे विवाहास संमती देत नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रेमीयुगुलाचे पोलिस ठाण्यातच लग्न लागल्याची घटना अमळनेर तालुक्यात घडली आहे.
घडले असे...
- शहरातील बँक कॉलनीत राहणा-या राहुल प्रताप साळुंखे या तरुणाचे व शंकर नगरातील वर्षा रमेश साळुंखे या तरुणीचे मागील दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. राहुल बी.ए उत्तीर्ण आहे.
- दोघेही आदिवासी पारधी समाजाचे आहेत. तरीदेखील दोघांच्याही कुटुंबाचा त्यांच्या लग्नाला विरोध होता.
- त्यामुळे राहुलने 9 जून रोजी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो खाजगी दवाखान्यात उपचार घेऊन शुक्रवारी बरा झाला. तरुणीनेदेखील अंगावर रॉकेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला.
- या दोन्ही कुटुंबियांचे मन परिवर्तन करण्यासाठी जिल्हा आदिवासी विकास परिषदेचे पन्नालाल मावळे, संजय पवार, अनिल प्रकाश पारधी, गुलाब साळुंखे यांनी पुढाकार घेतला. तडजोड करण्यासाठी पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी देखील समन्वयाची भूमिका पार पाडली.
- अखेर दोन्ही कुटुंब तयार झाले आणि शुक्रवारी रात्री अमळनेर पोलिस ठाण्यातच हे लग्न विधिवत संपन्न झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक देविदास बिऱ्हाडे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
- सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून दत्तगुरूंच्या साक्षीने हे लग्न संपन्न झाले आहे. उपस्थित सर्वांनी सुखाचा संसार करण्यासाठी दोघांना आशीर्वाद दिले.
पुढील स्लाइडवर पाहा फोटाेज...