आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीचशे फूट विहिरीत प्रेमीयुगुलाने घेतली उडी, तरुणी जागीच ठार, तरुण गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव जवळील विदगाव बसस्थानकाजवळील शेतातील अडीचशे फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाने गुरुवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रकि्षाचालक चेतन ज्ञानेश्वर सोळुंके (वय २३) याचे गावातील मयुरी राजेंद्र सपकाळे (वय २१) हिच्याशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही एकाच समाजाचे होते. मात्र, मयुरी घटस्फोटीत असल्याने चेतनच्या कुटुंबीयांचा लग्नाला प्रखर विरोध होता. ती माहेरीच राहत होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले.

घेतला.घरच्यांचा विरोध असल्याने ते दोघे एकत्र येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी पहाटे ४.३० वाजता गावात शांतता असताना ते दोघेही घराबाहेर निघाले. बसस्थानकाजवळील हरीश महाजन यांच्या शेतातील विहिरीजवळ आले. दोघांनी २५० फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत उडी घेतली. यात मयुरीचे डोके विहिरीतील मोटारीच्या लोखंडी अँगलवर आदळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. चेतन मात्र विहिरीतील गाळात पडला. त्याला विहिरीच्या काठावरचे दगड लागल्याने गंभीर जखमी झाला. जखमी चेतन हा मूळचा शिरागड (ता.यावल) येथील रहविासी आहे. मात्र, आठ वर्षांपूर्वी कामधंद्यानिमित्त त्याचे कुटुंब विदगाव येथे स्थायकि झाले. चेतनचे वडील राजेंद्र सोळुंके हे टेलरींगचा व्यवसाय करतात. तर मयुरीचे वडील मजुरी करतात. तिला दोन बहिणी आणि एक भाऊ असा परविार आहे.

आवाजाने वेधले लक्ष......
सकाळी वाजेच्या सुमारास ते दोघे एकमेकांच्या घरात नसल्याने परिसरात शोधाशोध सुरू झाली. काही तरुणांना बसस्थानकाजवळ असलेल्या विहिरीत आवाज आला. त्यामुळे विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर प्रकार उघडकीस आला. अर्ध्या तासांच्या प्रयत्नानंतर चेतनला बाहेर काढले. चेतनला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर मयुरीला काढण्यात आले. मात्र, तिचा जागेवरच मृत्यू झाला होता.

सापांचा हल्ला
विहीर कोरडी असल्याने सापांचे वास्तव्य होते. सापांनी ज्ञानेश्वर लीलाधर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने दोघांना काहीही झाले नाही.