आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उडदाला कमी भाव; आडते, शेतकऱ्यांमध्ये जुंपली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव बाजार समितीमध्ये हमीभावानुसार उडीद खरेदी केंद्र सुरू झाल्याने तालुक्यातील शेतकरी उडीद विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, खुल्या लिलावामध्ये आडते इतर बाजार समितीच्या तुलनेत उडदाला कमी भाव देत आहेत. यावरून सोमवारी शेतकरी आडत्यांमध्ये जुंपून शाब्दिक चकमक झाली. अखेर सभापती प्रकाश नारखेडे यांनी कार्यालयात बैठक घेऊन दोघांमधील वाद सामोपचाराने सोडवला.

जळगाव तालुक्यातील विदगाव, म्हसावद परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद विकायला आणले होते. सकाळी ११ वाजेदरम्यान खुल्या लिलाव पद्धतीने आडते शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत होते. मात्र, या वेळी आडत्यांनी खुल्या लिलावामध्ये शेतकऱ्यांच्या उडदाला प्रतिक्विंटल हजार ५०० रुपयांचा भाव दिला. चोपडा इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाला प्रतिक्विंटल हजार रुपये भाव देण्यात येत आहे. असे असताना जळगाव बाजार समितीमध्ये केवळ हजार ५०० रुपये भाव दिल्याने शेतकरी आडत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर शेतकऱ्यांनी उडीद विकण्याचा निर्णय घेतला. शेवटी हा वाद कृउबासचे सभापती प्रकाश नारखेडे यांनी आडते शेतकरी यांना बोलावले. त्यांनी आपल्या कार्यालयात मध्यस्थी करीत शेतकरी आडते यांच्यात समझोत्याने दोघांमधील वाद सोडवला. त्यानंतर पुन्हा लिलावास सुरुवात झाली. शेवटी आडत्यांच्या मागणीनुसार हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलने उडदाची विक्री केली.
बातम्या आणखी आहेत...