आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारठ्याचा एसटी प्रवाशांवर होतोय परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहराचे तापमान अंशांपर्यंत खाली घसरले आहे. त्याचा फटका जळगाव एसटी आगाराला बसला असून, प्रवासीसंख्या घटली आहे. गेल्या आठ दिवसांपासून एसटीचे भारमान सुमारे १० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे आधीच तोट्याचा सामना करणाऱ्या लाल परीच्या अडचणी वाढल्या आहेत.

अवकाळी पावसानंतर नागरिकांची दिनचर्या बदलली आहे. पहाटेपासूनच हुडहुडी जाणवत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीचा फटका एसटी महामंडळालादेखील बसला असून, नियमित अप-डाऊन करणारे नोकरदार वगळता प्रवासीसंख्या घटली आहे. आठवडाभरापूर्वी असणारे ६३ टक्क्यांवरील भारमान शुक्रवारी ५३ टक्क्यांपर्यंत खाली आले. सकाळी किमान १० वाजेपर्यंत सायंकाळी वाजेनंतर प्रवाशांची संख्या कमालीची रोडावली आहे. थंडीमुळे सहलींच्या नियोजनात मात्र वाढ झाली आहे. परिणामी, प्रासंगिक कराराच्या गाड्यांत वाढ झाल्याने फेऱ्यांमध्येही तफावत निर्माण झाली असल्याचे आगारप्रमुख एस.बी.खडसे यांनी सांगितले.
सकाळच्या शाळांतील उपस्थितीवरही परिणाम
गेल्याचार दिवसांपासून वातावरणातील गारठा कमालीचा वाढला आहे. परिणामी, आहार पेहरावातही बदल झाला आहे. तसेच पहाटे फिरणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गारठ्याचा सर्वािधक परिणाम सकाळच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर झाला आहे. पहाटे थंडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे सकाळी सात वाजता भरणाऱ्या शाळांची वेळ पुढे ढकलण्याची मागणी पालकांतर्फे होऊ लागली आहे. यासाठी पालक लवकरच जिल्‍हाधिकारी शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन वेळ पुढे ढकलण्याची मागणी करणार आहेत.