आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात जळगावमध्‍ये नीचांकी तापमानाची नोंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मान्सूनने देशातून काढता पाय घेताच थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगावचे तापमान घसरायला लागले. असून बुधवारी राज्यात नीचांकी तापमानाची नोंद जळगावात झाली.

यावर्षी जळगावात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मान्सून संपल्यानंतर लागलीच थंडीची चाहूल सुरू झाली. जळगावातील दिवसाचे तापमान 35 अंश नोंदविले गेले असले तरी रात्रीचे तापमान 11.6 अंश सेल्सियसपर्यंत घसरले. जळगावपाठोपाठ नाशिकचे तापमान 15.4 अंश सेल्सियस होते. जळगावच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.