आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्न तापी प्रकल्प सांडवा, प्रस्तंभ कामाला सुरूवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - पाडळसरे निम्न तापी प्रकल्पाचा सांडवा व नदीपात्रातील प्रस्तंभ कॉँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाला. दरम्यान, आठ दिवसांत संकल्पचित्र मिळणार असून बोहरा उपसा जलसिंचन योजनाही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार साहेबराव पाटील यांनी दिली.

सन 2013-14 च्या निधीमध्ये प्रत्यक्षात नदीपात्रातील सांडवा व प्रस्तंभाचे काम झाल्यास 3.24 मीटर उंची वाढून दोन टी.एम.सी.पाणी साचून अमळनेर शहर व सुमारे 12 गावांना फायदा होणार आहे. दोन हजार हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार आहे. सांडवा व प्रस्तंभाच्या कामास 24 कोटी रुपये खर्च येईल. आतापर्यंत प्रकल्पावर 249 कोटी खर्च होऊनही प्रत्यक्षात पाणी अडवता आले नव्हते. प्रत्यक्षात नदीपात्रातील काम न करता आजूबाजूच्या भिंतीचे सीओटीचे काम करण्यात येऊन सध्या गरज नसताना पैसा गुंतवून ठेवण्यात आला होता. याबाबत तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत आमदार साहेबराव पाटील व संबंधितांची बैठक झाली. यात योग्य दिशेने काम करण्याचे निर्देश संबंधिताना देण्यात आले होते. बोहरा योजना सुरू झाल्यास मारवड, गोवर्धन, कळमसरे, पाडळसरे, बोहरा या पाच गावांतील शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. निव्वळ वीजबिलअभावी ही योजना बंद होती. आमदार पाटील यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाठपुरावाकरून काम मार्गी लावले आहे.


शाळेच्या वॉलकंपाऊंडचे भूमिपूजन

आमदार पाटील यांच्या हस्ते पुनर्वसित पाडळसरे शाळेच्या वॉलकंपाउंडचे भूमिपूजनही करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सभापती ललिता बैसाणे, तिलोत्तमा पाटील, विक्रांत पाटील, सचिन पाटील, भागवत पाटील, मीना पाटील, रिता बाविस्कर, कविता पवार, योगिता पाटील, प्रा. रंजना देशमुख, कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे, उपकार्यकारी अभियंता अनिल सूर्यवंशी, शाखा अभियंता सुनील अमृतकार, बागुल, पी.आर.पाटील, शत्रुघ्न पाटील, विकास पाटील, भूषण पाटील, हिंमत कोळी आदी उपस्थित होते.