आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस सिलिंडर घरपोच देण्यास वितरकांकडून होतेय टाळाटाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मार्चअखेर पाच सिलिंडरची र्मयादा पूर्ण व्हावी, यासाठी ग्राहकांकडून हजारोंनी नोंदणी गॅस वितरकांकडे झाली आहे. मात्र, कमी वेळेत सर्वच डिलिव्हरी करणे शक्य नसल्यामुळे वितरकांनी सिलिंडरची घरपोच डिलेव्हरी करण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी गॅस ग्राहकांकडून केली जात आहे. मात्र, नेहमीपेक्षा अधिक क्षमतेने डिलिव्हरी पूर्ण करीत असून वेळेतही सर्वच पूर्ण होणार नसल्याने हा पर्याय कंपनीनेच सुचविला असल्याचे वितरकांचे म्हणणे आहे.

केंद्र शासनाने सूचित केलेल्या निर्देशानुसार मार्चअखेर पर्यंत पाच सिलिंडर मिळणार आहेत. ते पूर्ण न झाल्यास ते लॅप्स होणार आहेत. यामुळे ग्राहकांनी आपला कोटा पूर्ण करण्यासाठी नोंदणी केली आहे. एच.पी, भारत व इंडेनच्या वितरकांकडे मोठय़ा प्रमाणात ही नोंदणी झाली आहे. परिणामी त्यांनी ग्राहकांना गोडावूनमधून सिलिंडर नेण्याची सक्ती केली आहे. सुट्यांमुळे व मनुष्यबळाअभावी 31 मार्च अखेर नोंदणी झालेल्या संख्येइतके सिलिंडर घरपोच पोहोचवणे शक्य नसल्याचे वितरकांचे म्हणणे आहे.

* गोडाऊनमधून ग्राहकास सिलिंडर देण्याच्या कंपनीच्या सूचना आहेत. 1 एप्रिलपासून नवीन नियमाप्रमाणे सिलिंडर दिले जातील. दिलीप चौबे, भारत गॅस वितरक

* आता 450 सिलिंडरची बुकिंग पेंडिंग आहे. फक्त एक दिवस हातात आहे. यात यातील अध्र्यावर सिलिंडर डिलेव्हरी करू. उर्वरित ग्राहकांना ते घेऊन जाणे भाग आहे. सौरभ पाटनी, एचपी गॅस वितरक