आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ शहरात सिलिंडरची प्रतीक्षायादी चार हजारांपर्यंत वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरात गेल्या आठवड्यापासून निर्माण झालेली गॅस सिलिंडरची टंचाई अद्यापही कायम आहे. कंपनीकडून वेळेवर पुरवठा होत नसल्याने एजन्सीचालक वैतागले असून आता एचपीसोबतच भारत गॅसचे सिलिंडरदेखील मिळेनासे झाले आहेत. यामुळे शहरातील ग्राहकांची प्रतीक्षायादी तब्बल चार हजारांपर्यंत पोहोचली आहे.

शहरात भारत, एचपी आणि इंडेन कंपनीच्या एकूण १० गॅस एजन्सी आहेत. यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त ग्राहक आहे.
आतापर्यंत एचपी गॅसच्या सिलिंडरचा ट्रक वेळेवर येत नसल्याने ग्राहकांची पंचाईत झाली होती. त्यात आता भारत गॅसची भर पडली आहे. परिणामी प्रतीक्षा यादीतील ग्राहकांची संख्या आता चार हजारांवर पोहोचली असून एका एजन्सीत सरासरी ४०० ची प्रतीक्षायादी आहे. भारत गॅस एजन्सीत ३०० सिलिंडरची गाडी येते. या सिलिंडरचे वाटप करूनही पुन्हा ४०० जणांची प्रतीक्षा यादी कायम राहते.