आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्ष राहून थांबवता येतील सिलिंडर स्फोटाच्या घटना, गृहिणींना मोलाचा सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घरगुती गॅसचा वापर करताना सिलिंडरचा स्फोट होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वर्षभरात शहरासह तालुक्यात सिलिंडर स्फोट, भडका होऊन आग लागणे व नुकसानीच्या 13 घटना घडल्या आहेत. यातील अयोध्यानगरातील घटनेत स्फोटामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. या सर्व दुर्घटना गॅस लिकेज अन् चुकीच्या सिलिंडर जोडणीमुळे होतात. त्या रोखण्यासाठी आता ग्राहकांनी दक्ष राहणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयीच्या काही टिप्स देत आहोत.
ग्राहकांकडून तपासणीबाबत टाळाटाळ
सिलिंडर स्फोटाच्या घटना रोखण्यासाठी गॅस वितरकांकडून ग्राहकांना घरपोच मॅँडेटरी इन्स्पेक्शनची सुविधा देण्यात येते. त्यासाठी वितरकांनी कर्मचार्‍यांची नियुक्तीही केलेली आहे. वर्षातून किमान एकदा गॅस संचाची तपासणी करणे बंधनकारक असून, त्यासाठी 50 ते 75 रुपये फी आकारली जाते; मात्र ग्राह क तपासणीबाबत टाळाटाळ करत असल्याचे वितरक सांगतात. तसेच लिकेजसंबंधीची माहिती दिल्यावर सिलिंडरची तपासणी करणे वितरकांना बंधनकारक आहे; परंतु ग्राहकच आपल्या हक्कांबाबत अनभिज्ञ आहेत. शहरात भारत, एच.पी. व इंडेन गॅसचे अधिक वितरक व ग्राहक आहेत; मात्र भारत गॅसच्या ठरावीक वितरकांव्यतिरिक्त अन्य कंपन्यांचे वितरक पुरेशा सुविधा देत नसल्याची ग्राहकांची ओरड असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वितरकाकडे सुविधाबाबत तक्रार करुनही दुर्लक्ष होते.

पुढील स्लाइडमध्ये, गॅस लीक झाल्यास हे करा