आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाअनुदानित सिलिंडर एक तर अनुदानित आठ दिवसांत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सिलिंडर वापरावर आलेली र्मयादा, यातच केवायसीची डेडलाइन यामुळे गॅसग्राहक कमालीचा त्रस्त आहे. यात अनुदानित, विनाअनुदानित सिलिंडरचा घोळ अद्यापही सामान्यांच्या लक्षात येत नाही. गॅस ग्राहकांच्या हक्काचे अनुदानित सिलिंडर मिळवण्यासाठी आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असताना, विनाअनुदानित सिलिंडर मात्र नोंदणी करताच एका दिवसात उपलब्ध होत आहे. वितरण पद्धतीतील या असमतोलामुळे गॅसग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे ग्राहकांमध्ये द्विधास्थिती निर्माण होत आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने वर्षाला सहा सिलिंडरची घोषणा केली होती. त्यानुसार 14 सप्टेंबरपासून मार्चपर्यंत तीन अनुदानित सिलिंडर दिले जाणार आहेत. अनुदानित सिलिंडर 445 तर विनाअनुदानित सिलिंडर 950 रुपयांत ग्राहकांना दिले जाते. र्मयादित कोटा संपलेल्या ग्राहकांनी नोंदणी केल्यास संबंधित ग्राहकांना त्याच अथवा दुसर्‍याच दिवशी 950 रुपये घेऊन डिलिव्हरी दिली जाते. मात्र, कोटा पूर्ण न झालेल्या ग्राहकांना अनुदानित सिलिंडरसाठी नोंदणी करूनही पाच ते आठ दिवस प्रतीक्षा करावी लागते. ग्राहकाने संबंधित वितरकाकडे नोंदणी केल्यानंतर वितरकाकडे असलेल्या रेकॉर्डवरून डिलिव्हरीची वेळ ठरवली जाते. विनाअनुदानित असल्यास तत्काळ सिलिंडर घरपोच केले जाते. या विषयी वितरकांनी वितरणपद्धती विषयी कुठलेही विश्लेषण न करता प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा असल्याचे सांगितले.