आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LPG Gas Problems Issue At Jalgaon, Divya Marathi

सिलिंडर पुरवठाच ‘गॅस’वर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गॅस सिलिंडर भरण्याची हमाली वाढवून मिळावी यासाठी माथाडी कामगारांनी शनिवारी संप पुकारला. त्यामुळे जळगाव येथील भारत गॅस प्लान्टवरील 35 गाड्या सिन्नर प्लान्टकडे रवाना केल्या. सलग चार दिवस सिलिंडरचे लोडिंग न झाल्याने शहरासह जिल्ह्यात सिलिंडरचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. दरम्यान, याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी कंपनीने ट्रान्सपोर्ट, माथाडी कामगारांची बोलावलेली बैठक निर्णयाविना आटोपल्याने यावर 6 रोजी जिल्हाधिकार्‍यांसमेवत बैठक बोलावली.
बीपीसीएल कंपनीच्या जळगाव येथील प्लॉन्टवरून दररोज सिलिंडरच्या 70 गाड्या भरल्या जातात. त्यासाठी दोन शिफ्टमध्ये माथाडी कामगार गाड्या लोड करतात. सन 2011पासून वाहतूकदार संघटना माथाडी कामगार संघटनेला महिना भरल्यानंतर चेकद्वारे पेमेंट करते. माथाडी कामगारांची प्रतिगाडी मजुरी वाढवून द्यावी या मागणीसाठी 29 एप्रिल रोजी कामगार आयुक्तांसोबत माथाडी कामगार व वाहतूकदार यांची बैठक झाली. या बैठकीत बीपीसीएल कंपनीने वाहतूकदारांना दिलेल्या 15 टक्के वाढीप्रमाणे 300 रुपये देण्याचा निर्णय झाला. त्यालाही माथाडी कामगारांनी विरोध केल्यावर वाहतूकदारांनी 310 रुपये मान्य केले. 30 रोजी गाड्या भरल्यानंतर 1 मेची कामगार दिनाची सुटी व 2 मेची अक्षय तृतीयेची सुटी या सलग दोन दिवसांच्या सुटीनंतर तिसर्‍या दिवशी शनिवारी माथाडी कामगारांनी थेट 400 रुपये रोख मिळावेत या मागणीसह गाड्या भरण्यास नकार दिला.