आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूरात खासगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; 25 प्रवाशी जखमी, 5 गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर- खासगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 25 प्रवाशी जखमी झाले. यापैकी 5 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात‍ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर रायंगण फाट्याजवळ आज (शुक्रवारी) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सुरतहून धुळ्याकडे येत असलेल्या ट्रकने मालेगावहून-सुरतकडे जाणारी खासगी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 25 जखमी झाले. अपघातात बस रस्तावर आडवी झाल्याने नागपूर सुरत महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. नंतर क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला करण्‍यात आली.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी उपपोलिस निरीक्षक निकम, भेट देऊन पाहणी केली असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... खासगी बस आणि ट्रकच्या भीषण अपघाताचे फोटो...