आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दूध संघ निवडणूक रिंगणातून मच्छिंद्र पाटील बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- संस्थेचे अध्यक्ष किंवा पंच कमिटी सदस्य नसतानाही ठराव पाठवण्यात आल्याचे छाननीत सिद्ध झाल्याने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे यांच्यासह ११ जणांचे ठराव वगळण्यात आले आहेत. अशाच पद्धतीने रातोरात ठराव करून पाठविणऱ्यांना रिंगणातून बाहेर काढण्यासाठी विराेधकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी ४०४ मतदार होते. यापैकी ३८० संस्थांनी मतदानासाठी ठराव करून पाठविले हाेते. २४ संस्थांचे ठराव प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे ३६९ मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर हरकती स्वीकारण्यात येऊन नंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.
नाव वगळण्यात आलेल्या दूध उत्पादक सोसायट्या
चाळीसगावतालुक्यातील म्हाळसादेवी महिला दूध उत्पादक सोसायटी मर्यादित दस्केबर्डी, सरस्वती महिला दूध उत्पादक संस्था (धामणगाव), वाघळी दूध उत्पादक सोसायटी, क्रांतिज्योती महिला दूध उत्पादक सोसायटी (पातोंडा), चोपडा तालुक्यातील श्रीकृष्ण दूध उत्पादक सहकारी सोसायटी(चहार्डी), गजानन दूध उत्पादक सोसायटी, तांदलवाडी, धरणगाव तालुक्यातील श्रीकृष्ण दूध उत्पादक सहकारी सोसायटी (रेल), एरंडोल तालुक्यातल गजानन दूध उत्पादक सहकारी सोसायटी (उमरे), जळगाव तालुक्यातील पाथरी दूध उत्पादक सोसायटी (पाथरी), रावेर- किसान दूध उत्पादक सोसायटी सावदा, विवरे खुर्द दूध उत्पादक सोसायटी.
अमळनेर : जयचंडिका देवी सहकारी दूध उत्पादक सोसायटी, चावखेडा भडगाव: वडजीदूध उत्पादक सोसायटी, वडजी, सेवालालल दूध उत्पादक सोसायटी वसंतवाडी, भुसावळ: पिंपळगावबुद्रूक दूध उत्पादक सोसायटी, चाळीसगाव: गोपालकृष्णमहिला दूध उत्पादक सोसायटी हिंगोणेसिम, शिवकृपा महिला दूध उत्पादक सोसायटी, कुंझर, जयभवानी दूध उत्पादक सोसायटी करमुड, चोपडा: अनेर दूध उत्पादक सोसायटी, घोडगाव, काळभैरव दूध उत्पादक सोसायटी मंगळुर, गजाजन दूध उत्पादक सोसायटी गलवाडे, जळगाव: हरिओम महिला दूध उत्पादक सोसायटी उमाळे, जामनेर: श्रीकृष्ण दूध उत्पादक सहकारी सोसायटी करमाड, मुक्ताईनगर: नंदकिशोर दूध उत्पादक सोसायटी चांगदेव, संत मुक्ताई दूध उत्पादक सोसायटी चिखली, महिला दूध उत्पादक सोसायटी धाबेपिंप्री, पाचोरा:सामनेरदूध उत्पादक सोसायटी, जय संतोषी माता सोसायटी कुऱ्हाड खुर्द, गुरुदत्त दूध उत्पादक सोसायटी वडगाव खुर्द, पारोळा: पिंपळभैरव दूध उत्पादक सोसायटी, शेळावे दूध उत्पादक सोसायटी, लोणीसिम दूध उत्पादक सोसायटी, रावेर: कोचूरबुद्रूक सहकारी सोसायटी, जय भवानी दूध उत्पादक सोसायटी कुसुंबे खुर्द.
११ संस्थांचा प्रारूप यादीत समावेश नाही
- नियमानुसार प्रस्ताव नसलेल्या ११ संस्थांचा प्रारूप यादीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यांना १५ जूनपर्यंत हरकती घेता येतील. त्यावर नाशिक विभागीय निबंधक तथा निवडणूक अधिकारी निर्णय घेतील.
भाऊसाहेब महाले, साहाय्यक तालुका निबंधक
१५ जूनपर्यंत घेता येतील हरकती
ते १५ जून रोजी संध्याकाळी वाजेपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती अपेक्षा सादर करता येतील. २५ जून रोजी प्राप्त हरकती अपेक्षांवर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक, नाशिक यांच्या कार्यालयात निर्णय घेण्यात येईल. २९ जून रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.