आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्यसेवेतून पुन्हा रचला इतिहास: दीड लाख रुग्णांची तपासणी, 25 एकरावर शिबिर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुग्णाची नेत्रतपासणी करताना डॉ.तात्याराव लहाने. - Divya Marathi
रुग्णाची नेत्रतपासणी करताना डॉ.तात्याराव लहाने.
फैजपूर/यावल- देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत १९३६ मधील अधिवेशनामुळे सुवर्णक्षणांची साक्षीदार ठरलेल्या फैजपूरनगरीत ८१ वर्षांनी आरोग्यसेवेच्या माध्यमातून पुन्हा इतिहास रचला गेला. पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप आणि महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आयोजित या महाआरोग्य शिबिरात तब्बल लाख ४४ हजार रुग्णांनी लाभ घेतला. 

फैजपूरमधील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर सोमवारी महाआरोग्य शिबिर झाले. सर्वपक्षीय पदाधिकारी-कार्यकर्ते आणि लोकसहभागातून आयोजित या शिबिरासाठी गेल्या पंधरवड्यापासून मंत्री गिरीश महाजन, आमदार हरिभाऊ जावळे, आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची टीम परिश्रम घेत होती. आरोग्य, महसूल, आदिवासी विकास, नगरपालिका, ग्रामपंचायती, पोलिस प्रशासन, शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून या शिबिरासाठी ३० सप्टेंबरपर्यंत लाख रुग्णांची नोंदणी झाली होती. ऑक्टोबरला त्यात पुन्हा २० हजार रुग्णांची भर पडली. सोमवारी शिबिरात प्रत्यक्ष लाख ४४ हजार रुग्णांची तपासणी औषधोपचार करण्यात आले. सायंकाळी वाजेपर्यंत रुग्ण तपासणी सुरू होती. 

शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, महामंडलेश्वर जनार्दन महाराज, शास्त्री भक्तिस्वरुपदास, मानेकरबाबा शास्त्री, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, ए.टी.पाटील उपस्थित हाेते.
 
किडणी प्रत्यारोपणाचे २२ रुग्ण 
शिबिराचा एकूण लाख ४४ हजार रुग्णांनी लाभ घेतला. त्यात ३३ हजार नेत्ररोग, २१ हजार अस्थिरोग, १२ हजार जनरल, १७ हजार नाक-कान-घसा, १३ हजार त्वचारोग, हजार हृदयरोग आणि उर्वरित रुग्णांना किरकोळ व्याधी होत्या. दिवसभरात झालेल्या तपासणीअंती किडनी प्रत्यारोपणाचे २२, हृदय प्रत्यारोपण २, बोनमॅरो शस्त्रक्रिया २, शस्त्रक्रियेची गरज असलेले ४७ मूकबधिर बालके आणि नेत्रविकार असलेले ११ हजार ५०० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. यातील लहान शस्त्रक्रिया ऑक्टोबर, तर मोठ्या शस्त्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात सुरू होतील. 

खडसे,जैन अन् महाजनांची भेट
महा आरोग्यशिबिराच्या निमित्ताने भाजप नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते सुरेश जैन व्यासपीठावर एकत्र आले. व्यासपीठावर जैन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन एकमेकांच्या शेजारी बसले होते. तर दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आगमन झालेले एकनाथ खडसे हे महाजन जैन यांच्यापासून चार खुर्च्यांचे अंतर सोडून दीपक भगत यांच्याजवळ स्थानापन्न झाले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर व्यासपीठावरून उतरताना मंत्री महाजन, माजी मंत्री जैन यांनी आमदार खडसे यांच्याशी हस्तांदोलन करत अवघ्या १० सेकंदात भेटीची औपचारिकता पूर्ण केली. एकमेकांसोबत फारसा संवाद मात्र साधला नाही. 

- ३२०० डाॅक्टर्स
- १५००० स्वयंसेवक
- २५ एकर जागा 
- १२५ अाेपीडी
- ३२०० डाॅक्टरांचा ताफा 

शिबिरात ३२०० डाॅक्टरांनी रुग्ण तपासणी केली. नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, हृदयरोगतज्ज्ञ डॉ.रमाकांत पांडा, डॉ.अजय चंदनवाले, डॉ.नंदिता पालशेतकर, डॉ.मुजप्पल लक्कडवाला, डॉ.शशांक शहा, डॉ.जयश्री तोडकर, डॉ.रणजित जगताप, डॉ.नीता वर्टी, डॉ.शैलेश पुणतांबेकर, डॉ.भजन, डॉ.दीप चक्रवर्ती, डॉ.आनंद जोशी यांनीही शिबिरात रुग्ण तपासणी केली. 
बातम्या आणखी आहेत...