आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maha Health Camp At Jalgoan, Cm, Uma Bharati, 12 Minister & 50 Mla May Presents

जळगावात महाशिबीर: फडणवीस, उमा भारतींसह 12 मंत्री, 50 आमदारांची हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मंत्री, आमदार- खासदार हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध डझनभर मंत्री शिबिराला उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेबारा ते 1 च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उदघाटन होईल. यावेळी जळगाव जिल्ह्यासाठी अत्याधुनिक 20 रुग्णवाहिका, शववाहिका यांचे लोकार्पण करण्यात येईल.
35 हजार रुग्ण घेणार शिबिराचा लाभ
- जळगाव आणि परिसरातील भागातील सुमारे 35 हजार रुग्ण घेणार या शिबिराचा लाभ
- 5000 हजार रूग्णांवर शस्त्रक्रिया होणार
- 500 तज्ञ डॉक्टर या शिबिरात रूग्णांवर शस्त्रक्रिया करतील. यात काही डॉक्टर्स हे पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहेत.

- महाआरोग्यशिबिरात उपचार शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांची पूर्व तपासणी आणि नोंदणी करण्यात आली आहे.
- रूग्णांची पूर्वतपासणी केली असल्यामुळे तज्ञ डॉक्टर थेट उपचार व शस्त्रक्रिया करतील.
- या शिबिरात गरज भासल्यास अत्याधुनिक रुग्णवाहिकेमध्ये उपग्रहाद्वारे तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करतील.
- ह्दयरोगासह अनेक दुर्धर आजारांवर या शिबिरात मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातील.
- शिबिराच्या उद‌्घाटनप्रसंगी 20 रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले जाणार
- आगामी काळात दुष्काळग्रस्त भागात अशी शिबीरे आयोजित करण्याचा मानस गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

असे असेल मुख्यमंत्र्यांचे वेळापत्रक-
- दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे त्यांच्यासोबत असतील
- दुपारी 12.15 वाजता शिवतीर्थ मैदानासमोर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
- दुपारी 12.40 वाजता खान्देश सेंट्रल येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उदघाटन
- दुपारी 2 वाजता जैन हिल्स येथील आप्पासाहेब कृषितज्ज्ञ पुरस्कारांचे वितरण सोहळ्याला हजेरी
- सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन बैठकीत सहभाग
सलमान खानकडून अडीच कोटींची मदत-

या महाआरोग्य शिबिरासाठी सिनेअभिनेता सलमान खान याने तब्बल अडीच कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. महाशिबिराचा खर्च यातून भागवला जाणार आहे. शिबिरातून गरीब गरजू रुग्णांना मदत केली जाणार आहे.
पुढे वाचा, कोणते कोणते डॉक्टर राहतील उपस्थित...