आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

याद राखा... अॅट्राॅसिटीवर डाेळा ठेवाल तर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महिला मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ काढण्यात अालेल्या संघर्ष महामाेर्चात अॅट्राॅसिटी कायद्याचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा ठरला. अॅट्राॅसिटी कायद्यावर डाेळा ठेवाल तर याद राखा, असा इशारा देताना या महामाेर्चातून ‘नका नजर ठेवू लेकींवर...अख्खा भारत येईल अॅट्राॅसिटीच्या हाकेवर’ असे या कायद्याचे महत्त्वही पटवून देण्यात अाले. याच कायद्याला समर्थन देण्यासाठी काॅंग्रेसच्या डी.एस.अहिरे काशीराम पावरा या अामदारांनीही शहरात धाव घेत माेर्चात सहभाग घेतला. संघर्ष महामाेर्चानिमित्त शहरात तब्बल पाच तास निळे वादळ घाेंघावले. महिलांचा सहभाग यात लक्षणीय हाेता. जेल राेड संघर्ष माेर्चातील निळे झेंडे पटक्यांनी फुलल्याचे दिसून अाले.
शहरात शनिवारी संविधान दिनानिमित्त संघर्ष महामाेर्चा काढण्यात अाला. काेपर्डी येथे मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वातावरण घुसळून निघाल्यानंतर याच घटनेचा निषेध करण्यासह दलितांवर हाेणाऱ्या अत्याचाराविराेधात हा संघर्ष महामाेर्चा हाेता. मात्र, या माेर्चाचा सगळा राेख हा अनुसूचित जाती-जमातींना संरक्षण देणाऱ्या अॅट्राॅसिटी कायद्याला हाेणारा विराेध माेडून काढण्यावर हाेता. अॅट्राॅसिटी कायदा रद्द करू नका, त्यात काेणताही बदल घडवू नका; अन्यथा अागडाेंब उसळेल, असा इशाराच या संघर्ष महामाेर्चातून देण्यात अाला. शनिवारी सकाळपासून या महामाेर्चाची तयारी सुरू झाली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असलेल्या डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांच्या पुतळ्यानजीक सकाळी ८.३० वाजेपासूनच तयारी केली जात हाेती. संविधान दिनानिमित्त डाॅ. अांबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहारांच्या माळा घातल्यानंतर संविधानाचा जयघाेष करण्यात अाला. त्यानंतर सकाळी वाजेपासून नागरिक पुतळ्यानजीक जमायला लागले. पाेलिसांचा बंदाेबस्तही वाढायला लागला.
त्याचबराेबर या पुतळ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जेल राेडवर कारागृहाच्या मुख्य
माेर्चा सभास्थळी येत असताना मराठा समाजाच्या काही तरुणांनीही माेर्चेकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. अॅट्राॅसिटी कायद्याला समर्थन दर्शवताना या तरुणांनी व्यासपीठानजीक पाठिंबादर्शक सूचनाही केली. त्यांचे स्वागत किरण जाेंधळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले.
महामाेर्चाचा असाही विक्रम
संघर्षमाेर्चाची लांबी तब्बल तीन किलाेमीटर इतकी ठरली. सकाळी ११ वाजेपासून जेल राेडवर गर्दी व्हायला लागली. या गर्दीचे ११.३० वाजता माेर्चात रूपांतर झाले. माेर्चा बसस्थानकमार्गे निघाला. हा माेर्चा अाग्रा राेडवरून पुन्हा परतून जेल राेडवर येत असतानाच जेल राेडवरून माेर्चाच्या अखेरच्या शेपटाकडील नागरिक माेर्चासाठी जात हाेते. माेर्चा परत जागेवर अाला तरी माेर्चासाठी जाणाऱ्या नागरिकांचा असा एक वेगळा विक्रम ठरला.

तिन्ही बाजूंनी निळ्या वादळाचे जत्थे
शहराच्या चारही बाजूंनी ‘जय भीम’चा नारा देत निळे ध्वज निळ्या टाेप्या घालून माेर्चासाठी नागरिक जेल राेडकडे येत हाेते. त्याच वेळी जेल राेडवर मात्र तिन्ही बाजूंनी महिला तरुणींसह उत्साही तरुणांचे जत्थे दिसत हाेते. डाॅ. अांबेडकर पुतळ्याकडून येणाऱ्या नागरिकांनी रस्ता फुलून गेला. तेवढ्यात अाग्रा राेडने माेचीवाडा, वलवाडी तसेच जुने धुळे परिसरातून माेठे जत्थे येताना दिसले. यामुळे अाग्रा राेडवर काही काळ पायी चालणेही कठीण झाले हाेते. त्यामुळे काही काळ गर्दी रेंगाळली.

...अन् अश्रू झाले अनावर
संघर्षमाेर्चाच्या व्यासपीठावर बाेलायला मिळाले नाही म्हणून काही तरुणींना अश्रू अनावर झाले. सभा संपल्यानंतर माेर्चेकरी घराकडे परतत असताना व्यासपीठामागे काही तरुणी त्यांचे पालक रडताना दिसून अाले. त्या वेळी अाम्ही गेल्या महिनाभरापासून तयारी करून भाषण पाठ केले. मात्र, त्याचा काही उपयाेग झाला नसल्याचे तरुणींनी सांगितले. त्या वेळी संयाेजकांवरही त्यांनी राेष व्यक्त केला.

भगवान गौतम बुद्धांनी दिलेले पंचशिलाचे तत्त्वज्ञान पाच रंगांच्या ध्वजातून असे व्यक्त झाले.
शहरात शनिवारी काढण्यात आलेल्या संघर्ष महामोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला. बसस्थानकाकडून मोर्चात जाताना महिला.

प्रवाहाबाहेर जाती-जमाती फेकणार का?
^मागासवर्गीयजाती-जमातीयाच इथल्या मूळ रहिवासी अाहेत; परंतु शिक्षणाच्या अभावाने त्या मागे पडल्या. शिक्षित समाज प्रगत झाला. अाता या जाती प्रवाहात येताहेत. त्यांना संरक्षण देणारे कायदे रद्द करून प्रवाहाबाहेर घालवायचा प्रयत्न हाेताेय. -काशीरामपावरा, अादिवासी अामदार

विकास काेणापर्यंत पाेहाेचताेय?
^विकासाच्यामाेठ्यागाेष्टी सगळ्या स्तरांवरून केल्या जातात; पण हा विकास मागास घटकांपर्यंत खराेखर पाेहाेचताे अाहे का? याचा विचार करायला हवा. त्याशिवाय कायद्याचे महत्त्व बाकीच्या प्रगत घटकांना पटणार नाही. -डी.एस.अहिरे,अादिवासी अामदार
महामाेर्चाचा प्रखर इशारा
{ ‘नका नजर ठेवू लेकींवर...अॅट्राॅसिटीच धावून येईल हाकेवर’मधून पटविले महत्त्व
{ शहरात अवतरला निळ्या वादळाचा झंझावात; आदिवासींचाही पाठिंबा
{ महिला, तरुणींच्या सहभागाने जेल राेडला दिवसभर आले यात्रेचे स्वरूप
{ अाग्रा राेडसह तीन कि.मी.परिसर बंद; बाजारपेठेत शुकशुकाट, व्यवसाय ठप्प
बातम्या आणखी आहेत...