आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळती आठ टक्क्यांनी घटल्याने उन्हाळ्यात भारनियमन टळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - महावितरण कंपनीची वीजगळती अर्थात डीसीएल लॉसेस शहरात झपाट्याने वाढत होते. जून २०१५मध्ये महावितरणची तब्बल ३८.८ टक्के गळती होती. तर यापूर्वी एप्रिल २०१५मध्ये ही हानी ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. मात्र, महावितरण कंपनीने वीजगळती कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्न केल्याने, आता गळतीचे प्रमाण नोव्हेंबर ते डिसेंबरच्या रिव्ह्यूमध्ये ८.२८ टक्क्यांनी कमी झाले आहे.

शहरात वीजगळती ३०. ५२ टक्क्यांवर अाहे. महावितरण कंपनीने ग्रॉस लेव्हल गाठण्याचा प्रयत्न सुरू केला असून आगामी काळात उन्हाळ्यात काही प्रमाणात तरी भारनियमन कमी होईल, अशी आशादायक स्थिती आहे. वीजचोरी, वितरणादरम्यान होणारी गळती हे प्रकार डीसीएल लॉसेसमध्ये मोडले जातात. शहराला सध्या दीपनगर, चोरवड साकेगाव येथील ३३ बाय ११ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. वितरणाच्या तुलनेत हे अंतर खूप अधिक असल्याने वीज वितरण हानी दिवसेंदिवस वाढत होती. एप्रिल २०१५मध्ये शहरातील हानी तब्बल ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. टेक्निकल कमर्शियल लॉसेसमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक असली तरी चार गतगाळातील लॉसेसचा विचार करता लॉसेस कमी होते. शहरात विद्युत उपकरणांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आरएपीडीआरपी योजनेतून राबवण्यात येणारे उपक्रम पूर्णपणे यशस्वी झाले नव्हते. ऑक्टोबर ते नोव्हेंबरपासून अनेक कामे पूर्ण झाल्यामुळे गळतीचे प्रमाण कमी झाले आहे. महावितरण कंपनीने ग्रॉस लेव्हल अर्थात ४६.५ टक्क्यांपेक्षा खाली गळतीचा आकडा नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात वीजचोरट्यांवर कारवाई करणे, मीटरमध्ये केलेले फेरफार शोधणे, असे उपाय राबवले जात आहेत.

अत्याधुनिक मीटर गरजेचे : शहरातीलसर्वच भागांमध्ये वीज उपकरणांचे पुनरुज्जीवन आणि नवीन अत्याधुनिक यंत्रणा असलेले तसेच छेडखानी होऊ शकणारे वीजमीटर बसवल्यास वीजगळतीचे प्रमाण कमी होईल. महावितरण कंपनीने गेल्या काळातही वीजगळती कमी होण्यासाठी चांगला प्रयत्न केला आहे. हाच प्रयत्न टिकून राहिल्यास गळती अाणखी कमी हाेईल.

वीज चोरीवर आले नियंत्रण : शहरातीलअनेक भागांमध्ये वीजचोरीचे प्रमाण अधिक होते. यावर महावितरण कंपनीने बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. शहरातील ग्रीन पार्क, खडका रोडवरील विस्तारित भागांमध्येही वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. यामुळे चोरीचे प्रमाण कमी झाले. आगामी काळात या भागासाठीही स्वतंत्र सबस्टेशन हाेणार अाहे.

पावणेचार लाख वसुली : वीजवितरण कंपनीने दोन दिवसांपूर्वी सिंधी कॉलनीत थकबाकी वसुली मोहीम राबवली. त्यात एकाच दिवसांत पावणेचार लाख रुपयांची थकित बिलांची वसुली करण्यात आली. सोमवारी मंगळवारी खडका रोड भागात मोहीम राबवली जाणार आहे. कारवाई टाळण्यासाठी थकबाकी भरण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.

नाहाटा फीडर ग्रुपमध्ये : शहरातीलनाहाटा महाविद्यालय सबस्टेशनवरून जोडणी असलेले प्रेरणा नाहाटा फीडर यापूर्वी सी आणि डी ग्रुपमध्ये होते. या भागांमध्ये थकबाकी वसुली मोहीम राबवून डीसीएल लॉसेसही कमी झाल्याने सध्या हे दोन्ही फीडर ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत. यामुळे या भागात अत्यंत कठीण परिस्थितीमध्येच भारनियमन होते.

अशी होती गळती
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये वीजगळती ४० टक्के होती, जूनमध्ये गळती ३८.८ टक्के झाली. नंतर डिसेंबरमध्ये गळती आणखी कमी होऊन ३०.५२ टक्क्यांवर आली.

अागामी काळात कमर्शियल लॉसही कमी करण्याचे प्रयत्न
^शहरातील डीसीएल लॉसेस कमी करण्यात यश आले आहे. आगामी काळात कमर्शियल लॉसेसही कमी झाल्यास शहर भारनियमनमुक्त होईल. या दृष्टीनेही आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विविध ठिकाणी वसुली शिबिरे राबवली जात आहेत. मार्चपर्यंत ही कारवाई सुरूच राहील. व्ही. डी. नवघरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण