आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतराव्या शतकातील महादेव मंदिराला ‘ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा, मंदिराचा इतिहास...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदिर. - Divya Marathi
मंदिर.
धुळे - शिंदखेडा तालुक्यातील होळ येथील सतराव्या शतकातील श्री पंचमुखी महादेव मंदिराला शासनाने वर्गातील तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. तसेच मंदिर परिसरात सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून विविध विकास कामे होणार आहेत. सुमारे ६९ वर्षांपूर्वी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राजस्थानातून दगड मागवण्यात आले होते. मंदिर परिसरात होणाऱ्या विकास कामांमुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे. 
 
मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाण्यापासून सात किलोमीटर अंतरावर होळ गाव आहे. या गावातील श्री पंचमुखी महादेव मंदिराला एेतिहासिक वारसा लाभला आहे. पंचमुखी महादेवावर अनेकांची श्रद्धा असून, केवळ होळ गावातीलच नव्हे तर परिसरातील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिरात नेहमी गर्दी असते. या मंदिराला शासनाच्या तीर्थक्षेत्र निकष समितीने वर्गाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. मंदिर परिसरात दोन कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यात भक्त निवास, सभामंडप, पार्किंगसाठी शेड, संरक्षण भिंत, मंदिर परिसरातील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, पथदिवे, उद्यान, स्नानगृह, स्वच्छतागृह आदी कामांचा समावेश आहे. ही कामे झाल्यावर भाविकांची गैरसोय टळणार आहे. दरम्यान, मंदिर परिसरात दरवर्षी महाशिवरात्रीला विविध धार्मिक कार्यक्रम होतात. तसेच रामनवमीच्या दिवशी यात्रा भरते. शिवाय गावातून पालखी काढली जाते. तसेच अष्टमीला नवस तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीजेला हरिनाम सप्ताह होतो. श्रावण महिन्यात मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह होतो. 
 
राजस्थानातून मागवला दगड 
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एका वर्षाने मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात झाली. त्यासाठी राजस्थानमधील जयपूर येथून दगड कारागीर मागविण्यात आले हाेते. नरडाण्यापर्यंत रेल्वेमार्गाने हे दगड आणण्यात आले हाेते. गरम शिसे ओतून दगडी मंदिराची उभारणी करण्यात आल्याची माहिती जाणकार देतात. 
 
पुढील स्लाइडवर, मंदिराचा इतिहास... 
बातम्या आणखी आहेत...