आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government To Cut Pay Of Professors Who Are On Strike

संपकरी प्राध्यापकांचे वेतन कापणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सलग 65 दिवसांपासून परीक्षाकामावर बहिष्कार घालणाºया प्राध्यापकांवर शासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. ‘नो वर्क नो पे’ या धोरणानुसार खान्देशातील प्राध्यापकांच्या दोन महिन्यांच्या पगारातील 10 कोटी 50 लाख रुपये कपात होणार आहेत.

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघातर्फे खान्देशातील प्राध्यापकांचे दोन महिन्यांपासून बहिष्कार आंदोलन सुरू आहे. या काळात विविध शाखांच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा सुरू आहेत. मात्र, प्राध्यापक या कामात सहभाग घेत नाही. महाविद्यालयात येऊन हजेरी लावतात. सध्या परीक्षा सुरू असल्यामुळे अध्यापन कार्य थांबलेले आहे. अध्यापन करायचे नसल्यामुळे प्राध्यापक घरी निघून जातात. आंदोलन सुरू असल्यामुळे त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. प्राध्यापकांच्या या वागण्यावर शासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

संचालक कार्यालयात रेकॉर्ड
शासनाच्या आदेशावरून उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने काम न करणारे प्राध्यापकांच्या वेतन कपातीचे देयक प्राचार्यांकडून मागविले आहे. बुधवारी खान्देशातील 82 अनुदानित महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचे वेतन देयक सहसंचालक कार्यालयात पोहोचले आहेत.

तीव्र विरोध करू
प्राध्यापकांना परीक्षा कामाचे वेगळे मानधन दिले जाते. संपावरील प्राध्यापकांनी परीक्षासंबंधी काम केले नाही म्हणून त्यांचा पगार कपात करणे चुकीचे आहे. त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे. त्यामुळे जर शासनाने त्यांचा पगार कपात केला तर संघटनेकडून त्याचा विरोध केला जाईल. प्रसंगी आंदोलन तीव्र केले जाईल.
शिवाजी पाटील, अध्यक्ष, एमफुक्टो