आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र केसरी चाैधरी डीवायएसपी झाल्याने अानंदाेत्सव; मुख्यमंत्र्यांकडून निवड झाल्याचे अादेश प्राप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपविभागीय पाेलिस अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल विजय चाैधरीचा सत्कार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. साेबत गिरीश महाजन, उन्मेष पाटील, अनिल गाेटे, नथ्थू चाैधरी अादी. - Divya Marathi
उपविभागीय पाेलिस अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल विजय चाैधरीचा सत्कार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. साेबत गिरीश महाजन, उन्मेष पाटील, अनिल गाेटे, नथ्थू चाैधरी अादी.
चाळीसगाव- मुळचा सायगाव येथील रहिवासी तथा महाराष्ट्र केसरी सन्मान तिसऱ्यांदा प्राप्त केलेला विजय चाैधरी यास उपविभागीय पाेलिस अधिकारी पदाच्या नियुक्तीचे अादेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानिमित्त सायगावसह चाळीसगाव शहरात अातषबाजी करण्यात अाली. तसेच कुस्तीपटूंमध्ये अानंद पसरला. 
 
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अामदार उन्मेष पाटील, अामदार अनिल गाेटे यांच्या उपस्थितीत विजय चाैधरीला वर्ग दाेनचे उपविभागीय पाेलिस अधिकारी पदाचे नियुक्तीपत्र देण्यात अाले. साेबत विजयचे वडील नथ्थू चाैधरी हे देखील हाेते. गेल्या ते महिन्यांपासून विजय चाैधरीला पाेलिस दलात अधिकारी पदाची नियुक्ती हाेण्याची प्रतीक्षा हाेती. सायगाव येथे विजयची अाई, बहिण, इतर नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी अानंदाेेत्सव साजरा केला. 
 
विजय यानंतरही मैदानावर 
-विजयचे वर्ग दाेनचे पाेलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न हाेते. मुख्यमंत्र्यांनी उशिरा का हाेईना कायदेशीर बाबी पूर्ण करून विजयला उपविभागीय पाेलिस अधिकारीपदाची संधी दिली. त्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अामदार उन्मेष पाटील यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. विजयची कुस्तीची भूक अद्याप भागली नसून ताे देशासाठी कुस्तीचे मैदान गाजवत राहील. नथ्थू चाैधरी, विजयचे वडील 
 
उपविभागीय पाेलिस अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल विजय चाैधरीचा सत्कार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. साेबत गिरीश महाजन, उन्मेष पाटील, अनिल गाेटे, नथ्थू चाैधरी अादी. 
बातम्या आणखी आहेत...