जळगाव - विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर मनसेत राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. मुंबईत प्रविण दरेकर व नाशिकला वसंत गितेंपाठोपाठ जळगावातही पक्षात पडझड सुरू झाली आहे. दुस-या फळीतील नेत्यांवर नाराज असलेल्या जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी वैयक्तिक कारण पुढे करत राजीनामा दिला आहे.
पक्षप्रमुख राज ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातो.जळगावात ललित कोल्हे यांनी घेतल्याने मेहनतीमुळे मनसेला १३ नगरसेवक मिळाले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत मिळालेली वागणूक, पक्षाच्या नेत्यांकडून मिळालेल्या असहकार्यामुळे कोल्हे व्यथित होते. अखेर त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेवून पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्यासोबत शहर कार्यकारिणीतील पदाधिका-यांनीही राजीनामे दिले आहेत. मनसेचे सर्व नगरसेवक हे माझ्यासोबतच असल्याचा दावाही कोल्हे यांनी केला आहे.