आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena Corporator Lalit Kolhe Surender To Police

मनसे नगरसेवक ललित कोल्हे पोलिसांना शरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते ललित कोल्हे यांच्यासह १० जणांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी बुधवारी सकाळी ९.१० वाजता जिल्हापेठ पोलिसांना कोल्हे शरण आले. त्यांना न्यायाधीश संगीता शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली, तसेच जामीनही मंजूर करण्यात आला.

अजिंठा रस्त्यावरील रेमंड चौफुलीवर २९ ऑगस्टला सकाळी ६.३० वाजता वाळूच्या डंपरने आसोदा येथील ज्ञानदीप सुरेश चौधरी (वय २६) या तरुणाला चिरडले होते. त्या वेळी संतप्त जमावाने पोलिसांवर रोष व्यक्त केला होता. मनसेचे नगरसेवक कोल्हे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जमावाला चिथावणी देऊन, पोलिस उपअधीक्षक किशोर पाडवी यांना धमकी दिल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी कोल्हे बुधवारी पोलिसांना शरण आले. त्यांना न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांच्यावतीने अॅड. मुकेश शिंपी यांनी जामीन अर्ज सादर केला. तो मान्य करीत न्यायाधीश शिंदे यांनी जामीन मंजूर केला. तसेच अक्षय सुभाष नेहेते, अजय सुभाष महाजन, मिलींद मधुकर नारखेडे, विकास अशोक पाटील यांचेही जामीन अर्ज मंजूर केले. सरकारपक्षातर्फे अॅड. हेमंत मेंडकी यांनी कामकाज पाहिले.