आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena News In Marathi, Jalgaon Lok Sabha Seats

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगावमध्‍ये अजूनही ‘वेट अँण्ड वॉच’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा यासंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून कोणतेच आदेश आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते ‘वेट अँण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. मनसेचे 13 टक्के मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहतात ते महत्त्वाचे ठरणार आहे.


जळगाव शहरातील साडेतीन लाख मतदारांवर विजयी होणार्‍या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. खान्देश विकास आघाडीची भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर ठरणार आहे. खाविआपाठोपाठ आता मनसेच्या 12 नगरसेवकांना मिळालेल्या 13 टक्के मते कोणाच्या पारड्यात पडतात याकडे लक्ष वेधले जात आहे. पालिकेत खाविआच्या विरोधात भूमिका बजावत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे तर निवडणुकीत विजयी उमेदवार पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा देतील असे जाहीर केले आहे. परंतु जळगाव जिल्ह्यात कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यावा यासंदर्भात पक्षाकडून कोणताही निर्णय कळविण्यात आलेला नाही. पक्षाचे पदाधिकारी ‘वेट अँण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.