आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena News In Marathi, Raj Thackeray, Divya Marathi, BJP

वरिष्ठांच्या इशार्‍यानंतर मनसेतील बे‘शिस्त’कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेले मनसेचे स्वीकृत नगरसेवक अनंत जोशीं - Divya Marathi
भाजपच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेले मनसेचे स्वीकृत नगरसेवक अनंत जोशीं
जळगाव - भाजपच्या व्यासपीठावर मनसे जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीबाबतचा अहवाल अध्यक्ष राज ठाकरेंकडे सादर करण्यात आला आहे. अशा प्रकारची बेशिस्ती खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिल्यानंतरही बुधवारी मनसेच्या नगरसेवकांनी ए.टी.पाटलांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.
भाजपतर्फे शहरात प्रचार मोहीम राबवली जात आहे. यात प्रत्येक प्रभागातील नगरसेवकाला भेट दिली जात आहे. महायुतीच्या मेळाव्याला मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी उपस्थिती दिली होती. त्यानंतर संपर्क प्रमुख विनय भोईटे यांनी अशी बेशिस्ती खपवून घेतली जाणार नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. यासंदर्भात भोईटे यांनी आपला अहवाल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. अंतिम निर्णय ठाकरेच घेतील असेही ते म्हणाले. परंतु येत्या आठवड्यात जळगावला येऊन बैठक घेऊन कार्यकत्यार्ंशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. कोल्हेंच्या भूमिकेनंतर संपर्क प्रमुखांनी प्रतिक्रिया दिल्यानंतरही मनसेचे स्वीकृत नगरसेवक अनंत जोशींसह दोन्ही नगरसेवकांनी बुधवारी भाजपा उमेदवार ए.टी.पाटील यांच्या खांद्याला खांदा मिळवत प्रचारात सहभागी झाले होते. कालच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागून असताना आता प्रचारातील मनसेचा सहभागासंदर्भात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.