आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Police News In Marathi, Transfer, Divya Marathi

पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या दर दोन वर्षांनी होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - एकाच पोलिस ठाण्यात दोन वर्षे सेवा बजावणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांची आता बदली होणार आहे. त्यामुळे दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांची माहिती जमवण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पोलिस महासंचालक कार्यालयाने 7 एप्रिलला ‘पोलिस सुधारणा अध्यादेश-2014’ पारित केला आहे.


सध्या एका पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी सहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावत होते. मात्र, सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करून पोलिस महासंचालक कार्यालयाने ‘पोलिस सुधारणा अध्यादेश-2014’ जारी केला आहे. या अध्यादेशात पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे नमूद करण्यात आली आहेत.
त्यामुळे पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने जिल्हाभरातील सर्व पोलिस ठाण्यांकडूनतेथील कर्मचार्‍यांची माहिती मागवली आहे.


0 ज्या कर्मचार्‍यांचा उपविभागासह परिमंडळात चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल व सध्याच्या ठिकाणीही दोन वर्षे पूर्ण झाली असतील, अशा कर्मचार्‍यांची बदली होणार.
0 पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचा समावेश असलेल्या आस्थापना मंडळातर्फे कर्मचार्‍यांची बदली करावी.
0 पोलिसांच्या बदल्या करताना जिल्ह्यातील, आयुक्तालयातील किंवा परिक्षेत्रातील एकूण संवर्गाच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.


काय आहे परिपत्रक?
0पोलिस शिपायाच्या प्रथम नेमणुकीनंतर तीन वर्षांचा सेवा कालावधी मुख्यालयात.
0दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या कर्मचार्‍यांची त्याच उपविभागात दुसर्‍या ठाण्यात बदली.