आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रॉम्प्टन’ची गच्छंती अटळ, महावितरणला बसणार फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- फ्रँचायझी रद्द करून क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीची उचलबांगडी करण्याच्या हालचाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने सुरू केल्या आहेत. हा निर्णय अंतिम स्थितीत असून आठवड्याभरात कोणत्याही क्षणी क्रॉम्प्टनची उचलबांगडी होण्याची स्थिती आहे तर दुसरीकडे महावितरण कार्यभार घेण्यास सज्ज झाला अाहे. वीज मंडळाच्या प्रकाशगड कार्यालयाने या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली असून फ्रँचायझी रद्द होण्याची तारीख लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या वितरण फ्रँचायझी विभागाने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीकडून कोणत्याही क्षणी कार्यभार येणार असल्याने महावितरणचे अधिकारी कामाला लागले आहे. मात्र, क्रॉम्प्टनचे महाव्यवस्थापक प्रशासनाकडून या विषयावर बोलणे टाळले जात असल्याची स्थिती आहे. वीजपुरवठ्याच्या कामात अपयशी ठरल्याने क्रॉम्प्टननेच जाणीवपूर्वक थकबाकी थकवत फ्रँचायझी रद्द करण्याकडे पाऊल उचलल्याचेही बोलले जात आहे.

अभियंत्यांना घेण्यास संघटनेचा विरोध
फ्रँचायझी रद्दचा निर्णय का?

नोव्हेंबर२०११ रोजी क्रॉम्प्टनने शहरासह तालुक्याला वीजपुरवठा करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, सुरुवातीपासूनच कार्पोरेट कार्यालयाची निर्मिती करण्याच्या नादात कंपनीचे ग्राहक सेवा-सुविधांकडे दुर्लक्षच झाले होते. कंपनी प्रशासनाबद्दल आमदारांसह विविध संस्था, संघटनांकडूनही विरोध दर्शवला जात होता. त्यामुळे अनेकदा वाद-विवादासह कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या अनेक घटनाही पावणेचार वर्षांत घडल्या. कंपनीने कार्यालयात कॉल सेंटर, सीएफसी सेंटर यासह काही विशेष महत्त्वपूर्ण सुविधाही सुरू केल्या होत्या. मात्र, त्या यशस्वीपणे राबवण्यात यंत्रणा तोकडी पडल्याची स्थिती होती. यामुळे कंपनी प्रशासनाविरुद्ध ग्राहकांच्या मनात रोष वाढला होता.

७५ कोटींची बँक गॅरंटी
तीन महिन्यांपासून रखडलेली थकबाकी १६१ कोटींपर्यंत पाेहाेचली अाहे. ही थकबाकी थकवण्यासह करारातील अटींचा भंग केल्याने महावितरणने अनेकदा क्राॅम्प्टनला नोटीस दिली हाेती. त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले अाहे. त्यामुळे क्रॉम्प्टनचा करार मोडण्याचेही नियोजन वीज मंडळाने केले आहे. खासगी कंपनी महावितरणकडून वीज घेऊन ती ग्राहकांना विकून सेवा देत होती. मात्र, दर आठवड्याला विजेची रक्कम जमा करण्यासह ग्राहकांकडे थकलेले जवळपास ९९ कोटीही यामुळे थकणार आहेत. याचा मोठा तोटा वीज कंपनीला सहन करावा लागणार होता. त्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आला. क्रॉम्पटनने वीज मंडळाकडे ७५ कोटींची बँक गॅरंटी दिली आहे. मात्र, ही रक्कम जमा करूनही ८६ कोटींपेक्षा अधिक रकमेचे फ्रँचायझीकडे घेणे असल्याने हा निर्णय घेणे अपेक्षित होते.

फ्रँचायझी रद्द झाल्यास १२ अभियंते पुन्हा महावितरण कंपनीकडे येण्याची शक्यता आहे. या अभियंत्यांना महावितरणमध्ये घेतल्यास त्यांना परिमंडळांतर्गत कोठेही पदस्थापना देण्यात येऊ नये, अशी मागणी परिमंडळस्तरीय विद्युत कर्मचारी, अधिकारी अभियंता संघटनेच्या कृती समितीने मुख्य अभियंत्यांकडे केली आहे.

निर्णय अंतिम स्थितीत
फ्रँचायझी रद्द होणार? हे नक्की आहे. आठ दिवसांत यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निर्णय होऊन कार्यभार महावितरणकडे दिला जाईल. नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता, फ्रँचायझी विभाग (प्रकाशगड)
सेवा सुविधांकडे अधिक लक्ष दिले जाईल
थकबाकी भरण्याच्या नोटिसा देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने वीज कंपनीने हा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझी रद्द झाल्यास महावितरण कोणत्याही क्षणी कामकाज हाती घेण्यास तयार आहे. यासाठी मनुष्यबळाची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. यापुढे ग्राहकांच्या सेवा सुविधांकडे अधिक लक्ष दिले जाईल. जे.एम. पारधी, मुख्य अभियंता, महावितरण परिमंडळ
हा शासनाचा निर्णय आहे
याबाबत अजून मला काहीही माहित नाही. फ्रँचायझीचा निर्णय हा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे याविषयी अधिक काही बोलता येणार नाही. कंपनीच्या जनसंपर्क विभागामार्फत याची माहिती दिली जाईल. प्रदीप कार, महाव्यवस्थापक, क्रॉम्प्टन