आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Senior Citizens' Federation,latest News In Divya Marathi

जेष्ठांच्या प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्षच, ‘ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यां’वर ऊहापोह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून आश्वासनांची खैरात दिली जात आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित न्याय-मागण्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचा सूर शुक्रवारी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या चर्चासत्रातून निघाला.
महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे (फेस्‍कॉम) गंधर्व कॉलनीतील हॉलमध्ये‘ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या’ या चर्चासत्राचे आयोजन केले होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य सुविधांसह प्रवास, संरक्षण, विरंगुळा केंद्र या मागण्यांवर ज्येष्ठ नागरिकांनी उहापोह केला. यात फेस्कॉमचे उपाध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांनी फेस्कॉम संघटनेच्या कार्याची माहिती देऊन ज्येष्ठांच्या मागण्यांसाठी ज्येष्ठांनी संघटित होण्याची गरज व्यक्त केली. राजकीय पुढाऱ्यांवरील विश्वास आता राहिला नसल्याने ही लढाई ज्येष्ठांनाच लढावी लागणार आहे.
चैतन्यनगर मंडळाचे अध्यक्ष के.के. भोळे यांनी प्रवासात ज्येष्ठांना मिळणाऱ्या सवलती या तुटपुंजा आहेत. शासनाकडून वृद्धांसाठी अनेक योजना दाखवल्या जातात. मात्र, त्या मिळवण्यासाठी प्रशासकीय वर्गाकडून मोठी अडवणूक होते. याविरोधात जनआंदोलन उभारण्याची गरजही व्यक्त केली.

डॉ. शब्बीर शहा, डॉ.एस.आर.राणे, गुलाबराव बाविस्कर, एच.एन. पाटील, आशा तळेले, सुनंदा सुर्वे , एल.व्ही .बोंडे यांनी ज्येष्ठांची स्थिती मिळणाऱ्या सुविधा या विषयी आपली मते मांडली. श्यामकांत जोशी, आर.सी.पटेल, गंभीरराव चौधरी, भास्कर चिरमाडे, प्रा. दिलीप बोंडे यांनी नियोजन केले.
राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे आयोजित चर्चासत्रास ज्येष्ठ नागरिक बोलताना के. के. भोळे.
मागण्या शासनाकडे पाठवण्याचा ठराव

एफडीआरमध्येज्येष्ठांना टक्के सवलत मिळावी, ज्येष्ठांचे स्वतंत्र आयुक्तालय तयार करावे, ज्येष्ठांमधून एक मंत्री निवडण्यात यावा यासह निराधार ज्येष्ठांना हजार रुपये पेन्शन मिळावे या मागण्याही ज्येष्ठांनी चर्चासत्रात केल्या. या मागण्या शासनाकडे सादर करण्याचा ठरावही या वेळी झाला. शहरातील विविध भागांतील ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष यात चर्चेत सहभागी झाले होते.