आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मिसेस इंडिया\'च्या स्पर्धेत प्रथमच आदिवासी समाजातील महिलेची उपांत्य फेरीत धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर- नंदूरबार येथील पाटबंधारे विभागातील अभियंते शंकरराव कनाके यांची कन्या डॉ. कविता कनाके यांनी पुणे येथे नुकताच झालेल्या मिसेस इंडिया 2017 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. आदिवासी समाजातील पहिली व एकमेव स्पर्धक असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वैद्यकीय पेशा सांभाळताना, गृहिणी म्हणून घरात काम करताना येणारे अनुभव आणि सौंदर्य स्पर्धेतील विविध राऊंड मधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा अनुभव अनोखा असतो. आतापर्यंत मिसेस इंडिया स्पर्धेत प्रथमच आदिवासी समाजातील महिला उपांत्य फेरीत गेली आहे. याचा मला अभिमान आहे. आता पुणे येथे 6 मे रोजी होणाऱ्या स्पर्धेचे लक्ष्य असून, तेथे देखील आदिवासी समाजाचे नाव उंचवायचे आहे,  असा मानस मिसेस इंडिया 2017 स्पर्धेतील डॉ. कविता कनाके यांनी 'दिव्य मराठी'शी बोलतांना व्यक्त केला.

पुणे येथील मिसेस इंडिया 2017 च्या पश्चिम विभागाच्या ऑडिशन्यल मध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यातील 100 स्पर्धेत सहभागी झाले होते. नुकताच रंगलेल्या मिसेस इंडिया स्पर्धेच्या संचालिका दीपाली फडणीस यांच्या आयोजित स्पर्धेत विविध राऊंड पार करत उपांत्य फेरीत सौ कविता यांनी स्थान पटकावले आहे. पुढील स्पर्धेची तयारी मुंबई सुरू करण्यात आली आहे.
 
सामजिक कार्यात योगदान  
डॉ.कविता कनाके यांचे वैद्यकीय शिक्षण नागपूर येथे झाले आहे. त्या मुळ यवतमाळ येथील आहेत. सध्या मुंबई येथील जे.जे रूग्णालयात रुग्णसेवा करीत आहे. त्या विविध सेवाभावी संस्थाच्या संचालिका आहेत. सामजिक क्षेत्रात देखील योगदान आहे. डॉ.कविता कनाके यांची मिसेस इंडिया 2017 च्या उपांत्य फेरी साठी निवड झाल्याबद्दल नंदुरबार व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातून प्रशंसा केले जात आहे.

आदिवासी युवती बनू शकते विश्व सुंदरी... 
सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासीबहुल भागातील महिलांचे सौंदर्य विश्व सुंदरीच्या बरोबरीचे असते. त्यांना जर संधी मिळाली तर आदिवासी युवती विश्व सुंदरी बनू शकते. आदिवासी समाजातील महिलांना निसर्गाने खुप मोठ्या प्रमाणात सौंदर्य दिले आहे. अशा सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आदिवासी समाजातील जानकार लोकांना कडून बोलले जात आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, 'मिसेस इंडिया 2017' स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिलेल्या डॉ. कविता कनाके यांचे निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...