आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या एसटीवर राहणार आता थेट डेपो आगारातून नजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - एसटी बसेस अनधिकृत ठिकाणी थांबतात का? नियोजित ठिकाणी त्या वेळेत जातात का? यावर नजर ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने सेमी लक्झरी बसेसना जीपीएस यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यात पहिल्या टप्प्यामध्ये 100 गाड्यांना ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व सेमी लक्झरी बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. जळगाव आगारात 2 सेमी लक्झरी बसेस असून या दोघांमध्ये प्रायोगिक स्वरूपात जीपीएस यंत्रणेचे काम सुरू असल्याचे आगार प्रशासनाने सांगितले.
या कारणांमुळे जीपीएस आवश्यक : एसटी बसेस अनधिकृत ठिकाणी थांबण्याचे प्रकार बर्‍याचदा घडत असतात. त्यामुळे नियोजित ठिकाणी बस पोहोचण्यास उशीर होतो. बस अनधिकृत थांब्यावर थांबल्याची माहिती एसटी प्रशासनाला मिळत नाही. ट्रॅफिक जॅम किंवा अन्य कारणांमुळे बस पोहोचण्यास उशीर झाल्याचा प्रशासनाचा समज होतो; पण त्याला कारणच वेगळे असते. त्यामुळे एसटी प्रशासनाने सेमी लक्झरीवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएसचा निर्णय घेतला आहे.

100 शिवनेरी व्होल्वो गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात

02 जळगाव आगारातील सेमी लक्झरी बसेसची निवड

काय आहे जीपीएस यंत्रणा?
चालकाच्या कॅबिनमध्ये डॅशबोर्डखाली एक इलेक्ट्रॉनिक्स बॉक्स बसवला जातो. बसमधील रेडिएशननुसार त्याची स्थिती आगारात बसल्या बसल्या समजत असते. या सुविधेसह आगारात कॉम्प्युटराइज्ड आरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनही बसवले जाणार आहे.


अनधिकृत थांब्याला लागेल ब्रेक
पुणे-दादर, मुंबई-बंगळुरू याबरोबरच राज्यात इतर ठिकाणीही जीपीएस यंत्रणा चालू शकते. त्यानुसार महामार्गाचा विचार करून जीपीएस यंत्रणा बसवण्यात आलेल्या गाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा समावेश असणार आहे. त्यानुसार 100 शिवनेरी व्हॉल्वो गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून महिन्याभरात ही यंत्रणा कार्यन्वित होईल. त्यामुळे या गाड्यांना आता अनधिकृत थांब्यावर थांबता येणार नाही. जिल्ह्यात व्हाल्वो व शिवनेरी बसेस नसल्याने सेमी लक्झरींनाच ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे.