आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणची धडक मोहीम; अॉटोनगरात वीजचोरी उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रिमोट सेन्सरद्वारे वीजमीटरमध्ये फेरफार करून आणि थेट खांबावर आकडे टाकून विजेची चोरी करणाऱ्या शहरातील ऑटोनगरातील दोन थ्री फेज ग्राहकांची लाखाची वीज चोरी पकडली अाहे. त्याचबरोबर विविध क्लुप्त्या वापरून वीज चोरी करणाऱ्या आणि मंजूर क्षमतेपेक्षा अधिक वीज भार वापरणाऱ्या अयोध्यानगर, सद्गुरुनगर भागातील १२ वीज ग्राहकांच्या घरांना अचानक भेटी देऊन महावितरणच्या औद्योगिक वसाहतीमधील अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. वीज चोरी आणि गळतीच्या वाढत्या प्रमाणामुळे महावितरणने ही धडक मोहीम हाती घेतली असून घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.

एमआयडीसी भागातील महावितरणचे सहायक अभियंता सुरेश पाचंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी ऑटोनगर, ट्रान्सपोर्टनगर भागात पाहणी केली. ऑटोनगरातील वर्कशॉपचालक कलीम शेख रिया सुद्दीन यांच्या मीटरमध्ये अंतर्गत फेरफार करून वीजमीटर संथ करण्यात होते. वीज मंडळाच्या पथकाने मीटरची तपासणी केली असता, हे वीज मीटर ६२ टक्के कमी वेगाने फिरत असल्याचे आढळून आले. वर्कशॉपसाठी त्यांनी वापरलेल्या युनिटनुसार या वीज ग्राहकास ८८ हजार रुपयांचा दंड केला आहे. यासह याच भागातील असीफ अली मोहंमद हसन यांनी खांबावर आकडा टाकून वीज घेतल्याचे आढळले. त्यांनी एकूण ११ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढले. यामुळे या दोघांविरुद्ध वीजचोरीच्या १३५ कलमअंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे महावितरणचे सहाय्यक अभियंता सुरेश पाचंगे यांनी सांगितले.
उच्चभ्रू घरात अधिक वीजचोरी
घरातीलउपकरणांसाठी अधिकृतरीत्या विजेचा भार वाढवून घेता, घरगुती वीजभारावर वातानुकूलित अधिक वीज लागणारे उपकरणांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. घरगुती वीजमीटरमध्ये फेरफार करून या अधिक क्षमतेच्या वीज उपकरणांचा सर्रास वापर उच्चभ्रू घरांमध्ये वाढला आहे. याकडे महावितरणने विशेष लक्ष देत, अशा ग्राहकांचा शोध घेणे सुरू केले आहे. शहरातील उच्चभ्रू घरांमध्ये वातानुकूलित यंत्राचा वापर केला जात आहे. मात्र, यासाठी विशेष भार मंजूर करून घेणे आवश्यक आहे.
सद्गुरुनगर, अयोध्यानगरात कारवाई
घरगुतीवीज कनेक्शन घेऊन मंजूर वीजभारापेक्षा अधिक विजेचा वापर करणाऱ्या सद्गुरुनगर, अयोध्यानगर भागातील १२ वीजग्राहकांच्या बंगल्यांवर पथकाने काही दिवसांपूर्वी कारवाई केली अाहे. या ग्राहकांकडे ए.सी, वॉशिंग मशीनसह अधिक वीज लागणाऱ्या उपकरणांचा सर्रास वापर केला जात असल्याचे आढळून आले होते. या ग्राहकांवर १२६ कलमअंतर्गत मंजूर भारापेक्षा अधिक वीजभार वापरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंता सुरेश पाचंगे, यांच्यासह तंत्रज्ञ सुधाकर विसावे, किशोर वंजारी, कांतीलाल सपकाळे, गोपाळ बोरोले, प्रभाकर महाजन यांनी ही कारवाई केली.
वीजचोरी विरोधातविभागाचा ड्राइव्ह सुरू आहे, विविध मार्गाने चोरी करणाऱ्या ग्राहकांवर विशेष नजर असणार आहे. विजेची चोरी आढळून आल्यास ग्राहकांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. कमी भार दाखवून अधिक वापराचे प्रमाणही वाढले आहे, या ग्राहकांवरही १२६ कलमाअंतर्गत कारवाई अटळ आहे. विजेची मागणी वाढल्याने अनधिकृत वापरामुळे ट्रान्सफाॅर्मर जळण्याचे प्रमाण वाढले. यामुळे वीजचोरी मोहीम राबवली जात आहे. - जे.एम.पारधी,मुख्य अभियंता
बातम्या आणखी आहेत...