आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२५ हजारांची लाच घेणाऱ्या अभियंत्याला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - निवृत्तीनंतरची ग्रॅच्युईटीची रक्कम देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याला सहायक अभियंत्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली. गणेश पाचपोहे राजेंद्र काबरा अशी दोघांची नावे आहेत.

तक्रारदार हे महावितरण कंपनीतील एक निवृत्त अतिरिक्त कार्यकारी अभियंता अाहेत. त्यांच्या सेवाकाळात अमळनेर येथे कार्यरत असताना जवाहर विहीर याेजनेंतर्गत विहिरींना विद्युत पुरवठा करण्याची माहिती कार्यालयाला दिल्याने तसेच अमळनेर शहरातील वीजगळती १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी प्रयत्न केल्याने धरणगाव मंडळाचे कार्यकारी अभियंता गणेश तुकाराम पाचपाेहे यांनी खुलासा सादरकरण्यासाठी पत्र दिले हाेते. तक्रारदारांनी त्याबाबत वेळाेवेळी खुलासे सादर केले हाेते. ते ३१ मे राेजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या दाेन्ही प्रकरणातील खुलाशांवर ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांची १५ लाख रुपये ग्रॅच्युईटीची रक्कम मिळाली नव्हती. ना-हरकत प्रमाणपत्रासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता पाचपाेहे यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग साेनवणे यांच्याकडे मंगळवारी तक्रार केली. तडजाेडीनंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यासाठी तक्रारदार यांना अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात बाेलावले. मंगळवारी सायंकाळी वाजता कार्यकारी अभियंता पाचपाेहे यांनी सांगितल्याप्रमाणे सहायक अभियंता राजेंद्र शंकरलाल काबरा यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...