आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण अभियंत्यांचा अतिरिक्त पदभारास नकार, मागासवर्गीय विद्युत अभियंता संघटनेच्या बैठकीत निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिस्तभंगाच्या नावाखाली कारवाया करून नियमबाह्य महावितरण प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे अभियंता अधिकारी वर्गामध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. या विरोधात अतिरिक्त पदभार सांभाळण्याचा निर्णय परिमंडळस्तरीय मागासवर्गीय विद्युत अभियंता संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. परिमंडळात सुमारे 100 पेक्षा अधिक अभियंता अधिकारी वर्गाच्या जागा रिक्त आहेत.
मात्र, त्यांचा अतिरिक्त पदभार अभियंत्याकडे दिला जात आहे. प्रत्येक कक्षात मंजूर पदापेक्षा कमी कर्मचारी वर्ग आहे. अशा वातावरणात कामे करणे अवघड असताना, वेळोवेळी समस्यांची माहिती वरिष्ठ अधिका-यांच्या निदर्शनास आणूनदेखील त्याची दखल घेतली जात नाही. वीजहानी वाढत आहे. थकबाकी वसुली होत नाही. यासह ग्राहकांना मीटर इतर साहित्य मिळत नाही. त्यामुळे खप होत नाही, अशा विविध आरोपांखालील अतिरिक्त पदभार सांभाळणारे कर्मचारी वर्गावर सतत मासिक पगाराचे मिळकतीतून दंडात्मक पगाराची वसुली केली जात आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये प्रशासनाविषयी प्रचंड उदासीनता आहे. त्यामुळे अतिरिक्त पदभार स्वीकारत असताना कंपनीकडून कोणत्याही प्रकारची चुकीची कारवाई झाल्यास तत्काळ अतिरिक्त पदभार सोडून द्यावा कोणताही अतिरिक्त पदभार स्वीकारू नये, असा निर्णयही घेण्यात आला. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एस.के.लोखंडे, झोन अध्यक्ष एस.एच.गुरचळ, झोन सचिव एस.आर.पाचंगे, जे.एस.मेढे, चेतन तायडे यांनी विविध विचार मांडले.