आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahavitaran Giving Online Electricity Connection To The Consumar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म‍हावितरण ग्राहकांना विजेची जोडणी देणार ऑनलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कृषी, घरगुती, औद्योगिक वाणिज्य अशा सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना आता ऑनलाइन नवीन जोडणी घेण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.

ऑनलाइन वीज जोडणी घेणार्‍या ग्राहकाला ई-मेल द्यावा लागणार आहे. त्यानंतर कंपनीचे कॉलसेंटर या प्रस्तावित ग्राहकाशी संपर्क साधून त्यांनी दिलेल्या माहितीची खात्री करून घेईल आणि माहिती संबंधित कार्यालयाकडे पाठवेल. त्यानंतर शहरी भागासाठी सात दिवसात संबंधित उपविभागाचे कर्मचारी ग्राहकाशी संपर्क साधतील.

महावितरणला ‘अ’ दर्जा- केंद्रीय विद्युत मंत्रालयाने महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात झालेल्या मूलभूत कामांची नोंद घेऊन महावितरणला ‘अ’ दर्जा दिला आहे. नवी दिल्ली केंद्रीय ऊर्जामंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांनी ही घोषणा केली.