आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवात महावितरणच्या ॲपची जनजागृती, मिळणार या सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महावितरणने वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या मोबाइल ॲपद्वारे वीजबिल भरणा, नवीन वीज जोडणी अर्ज, वीजपुरवठा वीज देयक संबंधी तक्रारी अशा सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना या ॲपची माहिती व्हावी ॲपचा वापर वाढावा, या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शहरातील गणेश मंडळांना भेटी देऊन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी जनजागृती मोहीमेची सुरुवात केली.
 
गणेशोत्सव नवरात्रोत्सव काळात महावितरणकडून बॅनर,पोस्टर, माहिती पत्रके, प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून मोबाइल ॲप विषयी माहिती देण्यात येत आहे. त्या अंतर्गत मुख्य अभियंता जनवीर यांनी सुभाष चौकातील सुभाष चौक सहकारी पतसंस्थेच्या जय गोविंदा मित्रमंडळ गणेशमंडळास सोमवारी भेट दिली. वेळ, श्रम पैशाची बचत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत ग्राहकसेवा देणारे महावितरण मोबाइल ॲप वीजग्राहकांनी वापरावे, असे आवाहनही जनवीर यांनी केले. या वेळी अधीक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे, कार्यकारी अभियंता संजय तडवी, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, उपकार्यकारी अभियंता आर.डी. इंगळे, सहाय्यक अभियंता विजय कापुरे, रोहित गोवे उपस्थित होते. 
 
अॅपद्वारे मिळणार या सुविधा 
महावितरणमोबाइल ॲपद्वारे नेटबँकिग, क्रेडिट/डेबिट कार्ड, मोबाइल वॉलेट कॅश कार्डच्या माध्यमातून वीजबिल भरणा, नवीन वीज जोडणी अर्ज, वीजपुरवठा वीज देयक संबंधी तक्रारी, मागील आणि चालू वीजबिल भरणा पावत्यांची पाहणी, २४ बाय ग्राहकसेवा, मोबाइल क्रमांक ई-मेल आयडी अद्यावत करणे, ग्राहक आपल्या मीटर फोटोसह रीडिंग पाठवू शकतो. तसेच महावितरण सेवेविषयी अभिप्राय नोंदविण्याची संधी या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. महावितरण ग्राहक यांच्यामध्ये संवादसेतूची भूमिका बजावणारे हे मोबाइल ॲप आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...