आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahayuti News In Marathi, Lok Sabha Election, Eknath Khadse, Divya Marathi

महायुतीचा आज पहिला मेळावा; खडसे, पाटील, महाजन राहणार उपस्थित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाल्यानंतर भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचा पहिला जिल्हास्तरीय मेळावा 28 रोजी दुपारी 3 वाजता येथील लाडवंजारी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या नियोजनासाठी गुरुवारी रात्री 8 वाजता महायुतीच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली.


बैठकीला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, आमदार गिरीश महाजन, आमदार चिमणराव पाटील, शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख किशोर पाटील, उदय वाघ, अँड.किशोर काळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, प्रा.चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.


या मेळाव्याला तिन्ही पक्षांचे जिल्ह्याचे व तालुक्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे सदस्य आदी लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आले आहे. या मेळाव्यात तालुकास्तरावर मेळावे व प्रचाराची रणनीती ठरवण्यात येणार आहे.