आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ वर्षे मृत्यूशी झुंज देणाऱ्या महेंद्रचा मृत्यू, कॅन्सरमुळे तरुणाची अात्महत्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्र लोहार - Divya Marathi
महेंद्र लोहार
जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे किती आवश्यक आहे याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या या दोन घटना. १५ वर्षे अंथरुणाला खिळूनही उच्च शिक्षणाचे ध्येय बाळगून मृत्यूशी झुंजणाऱ्या एका तरुणाचा झोपेतच मृत्यू झाला; तर अन्य एका तरुणाने कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पालकांना उपचार झेपणार नाहीत, असे मानून खचलेल्या मनस्थितीत आत्महत्या केली.
जळगाव- क्रिकेटखेळताना महेंद्र लाेहार या तरुणाच्या पायाला बॅट लागली. त्यावर उपचार सुरू असतानाच त्याला अचानक संधिवाताने ग्रासले. या आजाराने ताे १५ वर्षे पलंगाला खिळून हाेता. डिसेंबर राेजी त्याने पलंगावरच अखेरचा श्वास घेतल्याने त्याचे ‘सायबर लॉ’ करण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

महेंद्र काशिनाथ लोहार (वय २९) हा लहानपणापासूनच अभ्यासात, खेळात हुशार होता. क्रिकेट, कराटे त्याचे अावडते खेळ होते. आर. आर. विद्यालयात त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. अकरावीत त्याने नूतन मराठा महाविद्यालयात प्रवेश घेतला. एकदा क्रिकेट खेळत असताना त्याच्या उजव्या पायाला बॅट लागली. यावर त्याने अाैषधोपचार केला. दुखणे बरे होत नसल्यामुळे जास्त प्रमाणात औषधी घेतल्यामुळे त्याला इतर आजार जडू लागले. २००१ मध्ये संधिवात झाल्यामुळे तो पूर्णपणे बेडरेस्ट वरगेला. त्यानंतर तो कधीच मैदानावर किंवा महाविद्यालयात येऊ शकला नाही. मात्र, अंथरुणावरच त्याचं सारं आयुष्य गुरफटून गेलं. डिसेंबर रोजी आई-वडिलांशी बोलत असताना त्याने ‘मी बरा होईल, तुम्ही खचून जाऊ नका,’ असे सांगून ताे झोपला पुन्हा कधीच उठण्यासाठी. त्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा आधारही गेला.

सायबरलॉ करण्याची होती इच्छा
महेंद्रनेफेब्रुवारी २०१४ मध्ये रुग्णवाहिकेत बसूनच बारावीची परीक्षा दिली होती. यात त्याला ७१ टक्के गुण मिळाले होते. पुढे त्याला सायबर लॉ करायचे होते. मात्र, त्याचे हे स्वप्न मृत्यूमुळे अधुरे राहिले.
आई-वडिलांनीकेली १५ वर्षे सेवा
महेंद्रलासंधिवातामुळे अंथरुणावर पडून रहावे लागत होते. त्याचे वडील काशिनाथ लोहार हे जिल्हा बँकेत अधिकारी होते. महेंद्रच्या सेवेसाठी त्यांनी २००८ पासून स्वेच्छानिवृत्ती घेतली. तर आई कुसुम यांनीही १५ वर्षे महेंद्रची सेवा केली. त्याला कधीही नाराज केले नाही. १५ वर्षांत त्याच्यावर उपचार करण्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च केले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य असल्यामुळे तो बरा होऊ शकला नाही, असे काशिनाथ लोहार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. महेंद्र हा लोहार दाम्पत्याचा एकुलता मुलगा होता.
- पुढील स्लाइ़ड्सवर वाचा, दिव्य मराठीने घेतली होती दखल...
- तरुणाने का केली अात्महत्या...
बातम्या आणखी आहेत...