आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maheshwari Mahila Mandal News, Dhule, Maharashtra

सामाजिक बांधिलकी: सेवाभावी संस्थेच्या मदतीतून शुभमंगल!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- आर्थिक स्थितीच्या संकटामुळे एकुलत्या एक मुलीच्या विवाहाच्या चिंतेत असलेल्या कुटुंबाला माहेश्वरी महिला मंडळाच्या सदस्यांनी मदतीचा हात दिला. यातून केवळ मदत करणे हाच उद्देश न ठेवता चक्क विवाहाची जबाबदारीही या मंडळाने उचलली आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सरसावलेल्या महिलांच्या माध्यमातून सोमवारी (दि. 17) ‘कोमल’ चे शुभमंगल होणार आहे. मंडळाच्या अध्यक्षा अरुणा भराडिया यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे.
समाजातील दुर्बल घटकांना साहाय्य करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करण्याचा उद्देश यामागे आहे. समाजाप्रती काही देणे लागतो. या भावनेतून शक्य तेवढी मदत करण्याची भूमिका माहेश्वरी महिला मंडळाची आहे. जुने धुळे परिसरातील राजस्थानी ब्राह्मण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, त्यांची कन्या कोमलच्या विवाहासाठी कन्येच्या भावाने मंडळाच्या अध्यक्षा अरुणा भराडिया यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. आई, वडील, भाऊ आणि बहीण असे त्यांचे छोटेखानी कुटुंब आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षणही फारसे होऊ शकले नाही. भाऊ एका दुकानात खासगी नोकरी करतो. त्यामुुळे मुलीचा विवाह करणे मुश्कील होते. मात्र, कोमलचा कल्याण येथील पवनकुमार याच्याशी विवाह जुळून आला. याबाबत सर्व माहिती अरुणा भराडिया यांनी घेतली आणि विवाहाचा सर्व खर्च करण्याचा प्रस्ताव मंडळासमोर ठेवला. त्यानंतर सर्वांनी सहकार्याची तयारी दर्शविली. माहेश्वरी मंडळातर्फे हा पहिला विवाह सोमवारी (दि. 17) होत आहे. स्नेहनगरातील महेश लॉन्स येथे हा विवाह होईल.