आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५१ ग्रामपंचायतींमध्ये येणार "महिलाराज'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा - तालुक्यात१०० पैकी ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात आॅगस्ट रोजी होणार आहेत. यात ५१ महिलांना सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले असून जिल्ह्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकाच दिवशी होणार असल्याने त्या शांततेत सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ९६ ग्रामपंचायतींपैकी ५१ ग्रामपंचायतीत महिलांना सरपंचपदासाठी स्थान मिळणार असल्याने महिला वर्गात नवचैतन्याचे वातावरण आहे.

पाचोरा तालुक्यात १०० ग्रामपंचायतींपैकी वडगाव तांडा, वडगाव आंबे, विष्णूनगर गाळण खुर्द या चार ग्रामपंचायती वगळता ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आॅगस्टला एकाच दिवशी होत आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणात ओबीसी महिलांसाठी १४ अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी एक तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी चार गावांमध्ये आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले आहे. या व्यतिरिक्त २७ सर्वसाधारण महिलांना सरपंचपदाचे आरक्षणाद्वारे संधी मिळाली असून यात अनुसूचित जातीसाठी माहिजी, दहिगाव, ओझर, बाळद बुद्रूक, अनुसूचित जाती महिला राखीव कळमसरा, खेडगाव (नंदीचे), घुसर्डी बुद्रूक, सांगवी प्र.लो. अनुसूचित जमातीसाठी खाजोळा, वडगाव, मुलाणे, टाकळी बुद्रूक, आसनखेडा बुद्रूक, लोहटार, चिंचखेडा खुर्द, अनुसूचित जमाती महिला राखीव गाेराडखेडा खुर्द, वरसाडे प्र.बो., कासमपुरा, खडकदेवळा खुर्द, भातखंडे, पिंप्री बुद्रूक प्र.बो. नागरिकांच मागास प्रवर्ग (ओबीसी) नाचणखेडा, सार्वे बुद्रूक, प्र.बो. बिल्दी, विष्णूनगर, अंतुर्ली खुर्द प्र.पा., आखतवाडे, मोहाडी, पहाण, सावखेडा बुद्रूक, कुरंगी, अंतुर्ली खुर्द, प्र.लो., बांबरुड बुद्रूक, महिला राखीव शेवाळे, नगरदेवळा, म्हसास, पिंप्री खुर्द प्र.पा., नेरी, खडकदेवळा बुद्रूक, कुऱ्हाड बुद्रूक, भोरटेक, वरखेडी, शहापुरा, लासगाव, लोहारा डोकलखेडा या व्यतिरिक्त उर्वरित सर्वसाधारण ५१ ग्रामपंचायतींपैकी २६ गावांमध्ये महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापेल अाहे.

आॅगस्टला मतदान
निवडणुकीसाठी१३ ते २० जुलैला उमेदवारी अर्ज दाखल करणे, २१ जुलै अर्जांची छाननी, २३ जुलै माघार मतदान चिन्हांचे वाटप, आॅगस्ट मतदान तर आॅगस्ट मतमोजणी होणार असल्याने ग्रामीण भागात निवडणूक चांगलीच रंगणार आहे. ग्रामीण भागात नेतृत्व करण्यासाठी अनेक तरुण सरसावले असून गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी राजकीय तयारी सुरू केली होती. ग्रामीण भागात निवडणुकीविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
बातम्या आणखी आहेत...