आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल लोकेशनवरुन लागला जुनैदच्या मारेकऱ्याचा छडा, अाराेपीला धुळ्यातून असे पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांची मालिका सुरू असतानच जुनैदच्या हत्येनंतर मोठा जनक्षोभ निर्माण झाला होता. - Divya Marathi
देशात जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांची मालिका सुरू असतानच जुनैदच्या हत्येनंतर मोठा जनक्षोभ निर्माण झाला होता.
साक्री (धुळे) -  दिल्ली-मथुरा पॅसेंजर रेल्वेत भोसकून हत्या करण्यात आलेल्या जुनैद नामक तरुणाच्या मुख्य मारेकऱ्याला धुळे जिल्ह्यातील साक्री येथे रेल्वे पोलिसांनी शनिवारी (८ जुलै) दुपारी अटक केली. त्याला सुरतमार्गे फरीदाबाद येथे नेण्यात आले आहे. चौकशीत त्याने आपला आरोप कबूल केल्याचा दावा रेल्वे पोलिसांनी केला आहे. देशात जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांची मालिका  सुरू असतानच जुनैदच्या हत्येनंतर मोठा जनक्षोभ निर्माण झाला होता.
 
या प्रकरणात गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी दिल्ली सरकारमधील एका ५० वर्षीय इसमासह पाच जणांना आधीच अटक केलेली आहे. प्रमुख आरोपी नरेश इंद्रसिंग जाट हा मात्र फरार झाला होता. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र रेल्वे पोलिसांच्या पत्रकात आरोपीचे नाव दिलेले नाही. नरेश जाटकडे असलेल्या मोबाइलच्या लोकेशननुसार पोलिसांनी त्याचा छडा लावला. तो महाराष्ट्रात साक्री भागात असल्याचे समजताच त्याच्या परिचयाच्या एकाला सोबत घेऊन पोलिस उपअधीक्षक (रेल्वे) महेंद्र सिंग हे पोलिस निरीक्षक अनिलकुमार आणि सुरेशकुमार यांच्यासह पोलिसांचा एक चमू घेऊन विमानाने सुरत येथे आले. तेथून कारने साक्री येथे पोहोचले. तेथे आल्यावर नरेशच्या परिचिताने त्याला फोन केला आणि साक्रीतील पेट्रोलपंपाजवळ बोलावले. तेथे येताच त्याला अटक करण्यात आली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश शुक्रवारीच  साक्रीत आला होता. महामार्ग चौपदरीकरणाच्या ठिकाणी काम मिळावे यासाठी त्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच वेळी रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात येत असल्याची नोंद साक्री पोलिस ठाण्यात करून हे पथक आरोपीसह दिल्लीकडे रवाना झाले, अशी माहिती साक्रीचे पोलिस निरीक्षक आर.एस. पाटील यांनी दिली.

काय होते प्रकरण
२२ जून रोजी दिल्ली-मथुरा पॅसेंजरने खांडवली गावाकडे परतत असताना १७ वर्षीय जुनैद व त्याचे भाऊ हाशिम आणि साकीर यांच्यावर गोमांस बाळगल्याच्या संशयावरून काही लोकांनी हल्ला केला होता. चाकूने भाेसकल्यामुळे जखमी झालेल्या जुनैदचा नंतर मृत्यू झाला होता. जुनैद व त्याचे भाऊ दिल्लीत ईदची खरेदी करून वल्लभगडमधील आपल्या खंडावली गावाकडे परतत होते.
 
पुढील स्लाइडमध्ये सीसीटीव्हीत कैद आरोपी... 
 
बातम्या आणखी आहेत...