आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इन जळगाव मीडिया नेटवर्क’च्या मुख्य कंट्रोलरूमला अखेर सील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘इन जळगाव मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन नेटवर्क’च्या एमअायडीसीतील सर्व प्रक्षेपण साहित्यासह कंट्राेल रूम बुधवारी दुपारी १२ वाजता सील करण्यात अाले. ही कारवाई तहसील कार्यालयाच्या पथकाने केली.

‘इन जळगाव मीडिया’चा परवाना रद्द करून मुख्य कंट्राेल रूमधील सर्व प्रक्षेपण साहित्य सीलबंद करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी दिले हाेते. त्यानुसार बुधवारी नायब तहसीलदार महेंद्र माळी, करमणूक निरीक्षक डी.बी.जाधव आणि तलाठी फिरोज खान यांनी कारवाई केली. या कारवाईविरोधात केबल चालकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे न्यायालयाचे पुढील आदेशापर्यंत केबल नेटवर्कचे कंट्रोल रूम सील राहणार आहे.

खासदार रक्षा खडसे भागीदार
जी.के. इंटरटेंमेंटमध्ये खासदार रक्षा खडसे यांची एकूण ७० टक्के तर घन:श्याम (दीपक) फालक यांची ३० टक्के भागीदारी आहे, असे जी. के. इंटरटेंमेंटने उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या पार्टनरशीप प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, जी. के. इंटरटेंमेंट शहरातील जोडणीधारकांकडून १०० व १५० रुपये घेणार आहे.

खडसे कुटुंबीय केबल व्यवसायात
खडसे कुटुंबीय अाता केबल व्यवसायात उतरले अाहे. त्यांच्या जी.के. इंटरटेंमेंटला उपविभागीय अधिकाऱ्यांनी परवाना दिला आहे. जी. के. इंटरटेंमेंटचे भागीदार घन:श्याम (दीपक) फालक यांनी ३० नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. अर्जानुसार त्यांनी २० जोडण्या दिल्या आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी ३० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे. त्याची जानेवारी २०१६ रोजी नूतनीकरण करण्याची तारीख होती. फालक यांनी २२ नोव्हेंबरपासून जी. के. इंटरटेंमेंट जळगाव या नावाने दूरचित्रवाणी केबल व्यवसाय २२ नोव्हेंबरपासून सुरू केल्याचे प्रतिज्ञापत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...