जळगाव - बहुजनक्रांती मोर्चामुळे दुपारी शहराच्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली तर रिंगरोड,गोविंद रिक्षा स्टॅाप ,चित्रा चौक बंद असल्याने वाहतूक कोंडी झाली. जळगाव बसस्थानकावर दुपारी १२ ते वाजेदरम्यान २०० एसटी बसेस ये-जा करतात. माेर्चा असल्याने पाेलिसांनी प्रमुख रस्ते बंद केले हाेते. दुपारी १२.४५ वाजेपासून माेर्चाला प्रारंभ झाला. त्यापूर्वीच रस्ते बंद असल्याने शहरात चारही बाजूने येणाऱ्या एसटी गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात अाल्या. शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान बसस्थानक असल्याने दाेन तास
एकही गाडी बसस्थानकात जाऊ शकली नाही
धुळे, चाेपड्याकडून येणाऱ्या बसेस रिंगराेडमार्गे शहरात अाल्या. काही बसेस अाकाशवाणी चाैक, रिंगराेड, स्टेडियममार्गे तर काही काेर्ट रस्ता, चित्रा चाैकमार्गे अजिंठा चाैफुलीकडे बाहेर पडल्या. भुसावळ, अाैरंगाबादकडून येणाऱ्या बसेस पांडे डेअरी, बीएसएनएल अाॅफिसमार्गे स्वातंत्र्य चाैकापर्यंत अाल्या. शहराच्या चारही बाजूने पर्यायी मार्गाचा शाेध घेत एसटी बस थांबून हाेत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांनी बसस्थानकाएेवजी मिळेल त्या ठिकाणी उतरून घेतले. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे प्रवासी मात्र ताटकळत बसले हाेते. बसस्थानकातदेखील प्रवासी लांब पल्ल्याच्या गाड्याची वाट पाहत हैराण झाले हाेते.
स्टेडियम ते रिंगराेडपर्यंत काेंडी
रिंगराेडमार्गेस्टेडियमकडून बसस्थानक जाता येईल म्हणून अक्कलकुवा जळगाव, पाचाेरा-जळगाव, मुक्ताईनगर-नाशिक, इंदूर, धुळे- जळगाव या गाड्या रिंगराेडमार्गे अाल्या. पुढे माेर्चा असल्याने पाेलिसांनी ४५ मिनिटे या बसेस थांबवून ठेवल्या. या बसेस मागे इतरही १५ गाड्या उभ्या राहिल्याने वाहतूक काेंडी झाली. उर्वरित गाड्या रिंगराेडवरील ख्याजामियाँ -गणेश काॅलनी रस्त्यावरून शाहू महाराज रुग्णालय, काेर्ट-चित्रा चाैकामागे गेल्या. बसस्थानकावर जाण्यास विलंब हाेत असल्याने लांब पल्ल्याच्या बसचालकांनी अागार व्यवस्थापकाशी संपर्क साधून माहिती दिली.
शहरात गर्दी
माेर्चानिमित्तशहरात अालेले माेर्चेकरी, माेर्चासाठी वळवण्यात अालेल्या वाहतुकीमुळे शहरात वाहतूक काेंडी झाली हाेती. माेर्चात सहभागी झालेले लाेक माेर्चातून पुन्हा शहरात मागे अाल्याने रस्त्यावर गर्दी कायम हाेती. दुपारी वाजेपर्यंत वाहतूक प्रभावीत झाली हाेती.