आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य जलवाहिनीला गळती; ३० तास चालणार दुरुस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या सहा महिन्यांपासून लक्ष्मीनगरात मुख्य जलवाहिनीला सुरू असलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार अाहे. सुमारे ३० तासांपर्यंत काम सतत सुरू राहणार असल्याने पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात अाला अाहे. २३ राेजी हाेणारा पुरवठा २४ राेजी करण्यात येणार अाहे. दरम्यान, २५ नाेव्हेंबर राेजी मेहरूण परिसरातील भिल्ल वस्तीजवळील वाघूरच्या मुख्य जलवाहिनीच्या गळतीची दुरुस्ती करण्यात अाली हाेती.
मेहरूणमधील लक्ष्मीनगरातील नाल्याजवळ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून वाघूर पाणीपुरवठा याेजनेंतर्गत टाकण्यात अालेल्या १२०० मिमी व्यासाच्या पीएससी जलवाहिनीला गळती अाहे. याबाबत नगरसेवक अनिल देशमुख हेमलता नाईक यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर अखेर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात अाले अाहे. दरराेज या गळतीतून लाखाे लिटल पाणी वाहून जात अाहे. त्यामुळे तातडीने दुरुस्तीसाठी स्थायी समितीतही प्रश्न उपस्थित करण्यात अाला हाेता. या संदर्भात २२ जानेवारीला गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार अाहे. सकाळी कामाला सुरुवात केली तरी अातापर्यंतचा कामाचा अनुभव लक्षात घेता यासाठी ३० तासांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता अाहे. त्यामुळे २३ राेजी पाणीपुरवठा हाेणार नसल्याने एक दिवस पुढे ढकलण्यात अाला अाहे. अाता २३ राेजीचा पुरवठा २४ राेजी हाेईल. तसेच २४ २५ राेजी हाेणारा पुरवठा अनुक्रमे २५ २६ राेजी करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिली. दरम्यान, २५ २५ नाेव्हेंबर राेजी मेहरूण परिसरातील भिल्ल वस्तीजवळील वाघूरच्या मुख्य जलवाहिनीच्या गळतीची दुरूस्ती करण्यात अाली हाेती. तसेच जानेवारी राेजी बेंडाळे महाविद्यालयासमाेर व्हाॅल्व नादुरूस्त झाल्याने गळती झाली हाेती. सततच्या जलवाहिनी गळतीमुळे शहराचा पाणी पुरवठा ढकलण्यात येत अाहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय याेजना करण्याची मागणी हाेत अाहे.

रविवारीचा पाणीपुरवठा
वाल्मीकनगर, अासाेदा राेड, रामेश्वर काॅलनी, एमडीएस काॅलनी, मास्टर काॅलनी, अक्सानगर, अयाेध्यानगर, माेहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा, दांडेकरनगर, मानराज पार्क, अासावानगर, निसर्ग काॅलनी, द्राेपदीनगर, मुक्ताईनगर, खाेटेनगर, शिवाजीनगर हुडकाे, एसएमअायटी, खेडीगाव, हिरा पाइप, शंकररावनगर, तांबापुरा, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, शिव काॅलनी, विद्युत काॅलनी, राका पार्क, विवेकानंदनगर, जिल्हा राेड, रामदास काॅलनी, महाबळ.
साेमवारी येथे पाणी

पिंप्राळा हुडकाे, अाशाबाबानगर, सेंट्रल बँक काॅलनी, अष्टभुजा, वाटिकाश्रम, निवृत्तीनगर, दादावाडी, अाहुजानगर, हिराशिवा काॅलनी, नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसाेनीनगर, समतानगर, साने गुरुजी काॅलनी, पार्वतीनगर, यशवंतनगर, भगवाननगर, रामानंदनगर, काेल्हेनगर, अंबिका साेसायटी, शिव काॅलनी, गणेश काॅलनी, श्रीकृष्ण काॅलनीत पाणीपुरवठा हाेईल.