आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: धुळ्याजवळ टायर फुटून ट्रक धडकला काळीपिवळीवर, 6 अाशा वर्करसह 18 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - टायर फुटून भरधाव ट्रक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळीपिवळी जीपवर धडकून झालेल्या भीषण अपघातात जीपमधील 18 प्रवासी ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले. धुळे तालुक्यातील अजंग शिवारात ही दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली. मृतांमध्ये सहा अाशा वर्करसह दहा महिलांचा समावेश अाहे. त्या मुकटी येथून बैठक अाटाेपून घरी परतत हाेत्या. दरम्यान, अपघातग्रस्त जीपचा अक्षरश: चक्काचूर झाला हाेता, त्यामुळे जीपमधून मृतदेह बाहेर काढणेही जिकिरीचे झाले हाेते.

अवजड वाहतूक करणारा ट्रक शुक्रवारी धुळ्याकडून जळगावच्या दिशेने चालला हाेता. याच वेळी पाराेळ्याहून प्रवासी घेऊन काळीपिवळी जीप धुळ्याकडे चालली हाेती. यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी हाेते. अजंग गावापासून काही अंतरावर एका दुचाकीला हुलकावणी देऊन भरधाव ट्रक या जीपवर समाेरून अादळला. अपघात इतका भीषण हाेता की जीपमधील १७ जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र जीपच्या समाेरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला हाेता. त्यामुळे त्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत हाेती. गाडीची काच ताेडून काही मृतदेह बाहेर काढावे लागले. अपघातस्थळी जणू रक्ताचा सडाच पडला हाेता. मृतांमध्ये मुकटी, फागणे, अजंग, धुळे, नवलनगर येथील रहिवाशांचा समावेश अाहे.

ट्रकचालक रतनसिंग गुरुबंदसिंग रंधवा (रा. शिवानंद कॉलनी, मोहाडी), दुचाकीचालक संजय निंबा पाटील (४५), नूतन संजय पाटील (४०, दोघे रा.चिचखेडा, ता. धुळे), प्रशांत नागराज पाटील (रा .अजंग), सरिता विश्वनाथ पाटील (४५, नवलनगर) अादी जखमी झाले अाहेत. अपघात पाहिल्यानंतर काही जणांना भोवळ आली, तर काही जणांना उलट्यांचा त्रास झाला. मदतीसाठी आलेल्या अजंग येथील काही तरुणांचे कपडे रक्ताने पूर्णत: माखले होते. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, नेमका कसा झाला अपघात.... बघा अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटोज....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...