आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरपूर: पाच कंदील परिसरात फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, एक गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरपूर- शहरातील पाचकंदील चौकात असलेल्या फटाक्यांच्या दुकानाला गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला धुळे येथे हलविण्यात आले आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावरील पाचकंदीलजवळ श्रीजी इलेक्ट्रिक नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या बाजूला नंदलाल अग्रवाल यांनी फटाक्यांचे दुकान लावले होते. या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता अचानक आग लागली. आगीमुळे फटाक्यांनी पेट घेतल्याने ते सर्वत्र उडत होते. त्यामुळे बाजूला असलेल्या श्रीजी इलेक्ट्रॉनिक दुकानालाही आग लागली.

नगरपालिकेच्या तीन अग्निशमन बंबांनी आगीवर अर्धातासात नियंत्रण मिळविले. या घटनेत नंदलाल अग्रवाल हे भाजल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले. ज्या वेळी ही घटना घडली त्या वेळी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. घटनेनंतर बाजारात पळापळ झाली. आगीमुळे श्रीजी इलेक्ट्रिक दुकानातील फ्रिज, टीव्ही जळून खाक झाले. फटाके विक्रेत्यांना शहराबाहेर खंडेराव मंदिराच्या परिसरात दरवर्षी जागा दिलेली असते. तेथे फटाक्यांची दुकाने आहेत. मग शहराच्या मध्य भागात फटाक्यांचे दुकान लागले कसे? नेमके कोणाच्या आशीर्वादाने हे दुकान मुख्य बाजारपेठेत थाटले होते? हाही प्रश्न निर्माण होत आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... भीषण आगीचे फोटो आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...