आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेजर रॉबर्ट गीलमुळे भुसावळला जागतिक संदर्भ : डॉ. जगताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - ज्यांच्यामुळे अजिंठ्याची जगप्रसिद्ध लेणी पुन्हा एकदा जगासमोर आली. ज्यांच्या चित्रकलेमुळे अंजिठ्यातील कलाकृतींना उजाळा मिळाला, अशा मेजर रॉबर्ट गील यांचे भुसावळमध्ये वास्तव्य आणि येथेच अखेरचा श्वास घेणे महत्वाची घटना आहे. जेव्हा-जेव्हा जागतिक पातळीवर अंजिठा लेणींचा विषय निघतो, तेव्हा मेजर गील आणि ओघाने भुसावळचा संदर्भ आवर्जुन दिला जातो, असे प्रा.डॉ. पी.डी.जगताप यांनी सांगितले.
 
१० एप्रिल १८७९ रोजी मेजर रॉबर्ट गील यांनी भुसावळमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. ख्रिश्चन रितीरिवाजानुसार भुसावळातील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, मेजर गील यांच्या प्रत्येक स्मृतीदिन शैक्षणिक-सांस्कृतिक, कला आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी त्यांच्या कबरीवर जावून पुष्पचक्र अर्पण करतात. यंदा यासाठी प्रा.दीपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीचे गठण करण्यात आले होते. त्यात सरचिटणीस म्हणून प्रा.डॉ.दिनेश महाजन, कोषाध्यक्ष मिलिंद सुरवाडे, प्रसिद्धीप्रमुख म्हणून प्रा.डॉ.दयाघन राणे यांच्यासह तीन सदस्य पाच सल्लागार आदींचा समावेश होता.

या सर्व मंडळींसह इतिहासतज्ज्ञ प्रा.डॉ.पी.डी.जगताप, सुरेश आमोदेकर,प्रा. जतीन मेढे, प्रा.डॉ.सोपान बोराटे, अजय पाटील, प्रा.डॉ.गिरीष कोळी, प्रा.नीलेश गुरचळ, प्रा.विश्वास वळवी, विकास मौर्या, कमलकुमाल जैन आदींनी सोमवारी सकाळी मेजर गील यांच्या कबरीवर पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्रा.डॉ.जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, रॉबर्ट गील ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीला होते. सन १८४२ ते मेजर पदावर निवृत्त झाले. त्यांनी अजिंठ्यातील कलाकृतींवर १७० चित्र काढून त्याचे इंग्लड जगभर प्रदर्शन भरवले. यामुळे खऱ्या अर्थाने अंजिठा जगासमोर गेले, असे सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...