आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संक्रांतीला गुजरातच्या तीळाचा गोडवा, दर 80 ते 100 रूपये किलो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : मकर संक्रांतीच्या ताेंडावर जळगाव शहरातील बाजारपेठेत तिळीची अावक वाढली अाहे. यात गुजरातमधून माेठ्या प्रमाणावर अावक हाेत अाहे. गेल्या वर्षीच तिळीचे भाव कमी झाले असून यावर्षी ते स्थिर असल्याची स्थिती अाहे. 
 
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यासह संपूर्ण देशात पर्जन्यमान चांगले हाेते. त्यामुळे तिळीचे उत्पादन मुबलक झाले. उत्पादन वाढल्याने मूग, उडीद अाणि तुरी पाठाेपाठ तिळीचे दरदेखील दुसऱ्या वर्षी त्याच मर्यादेत खाली अाहेत.
 
 सन २०१३-२०१५ या हंगामात तिळीचे दर किलाेमागे १४० ते १५० रुपयांपर्यंत पाेहोचले हाेते. गेल्या वर्षी ८० ते १०० रुपयांपर्यंत खाली अाले हाेते. त्यानंतर तिळीच्या बाजारभावात स्थिरता अाली अाहे. यावर्षीदेखील हाच दर कायम अाहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदादेखील भारतातून तिळीची निर्यात हाेऊ शकलेली नाही.
 
 देशांतर्गत उत्पादन अाणि ग्राहकांकडून असलेली मागणी यात तफावत कायम असल्याने तिळीचे भाव स्थिर अाहेत. दुसरीकडे तीळ उत्पादक अाफ्रिकन देशांमध्ये उत्पादन मुबलक झाले अाहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेतून तिळीची निर्यात हाेऊ शकलेली नाही, त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला अाहे. 

गेल्या वर्षीही हाच दर 
- विविध प्रकारची तीळ सध्या उपलब्ध अाहे. तिळीच्या गुणवत्तेनुसार ८० ते १०० रुपये प्रतिकिलो हाेलसेल भावामध्ये तीळ विक्री हाेत अाहे. गेल्या वर्षीदेखील हाच दर हाेता. 
महेश  चुगवाणी, तीळ विक्रेता. 
बातम्या आणखी आहेत...